3.8 C
New York

Kabaddi Association Election : कबड्डी असोसिएशन निवडणूकतून उदय सामंत, निलेश लंकेंचा अर्ज बाद

Published:

मुंबई

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या (Maharashtra State Kabaddi Association) निवडणूकीत मंत्री उदय सामंत आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अवैध ठरवला. उदय सामंत यांचा रत्नागिरीतून तर लंके यांचा अहमदनगरमधून अर्ज आला होता. कबड्डी असोसिएशन निवडणूक (Kabaddi Association Election) 21 जुलै रोजी पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन निवडणुकीच्या मतदानासाठी अर्ज पाठवण्यात आले होते प्रत्येक जिल्हयातून ४ नावेही महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकरी मंडळ निवडणुकीच्या मतदानासाठी पाठवण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४ नावांप्रमाणे १०० जणांचे अर्ज महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडे आले होते. यातील 7 अर्ज हे पीटीआर उतारा नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने अवैध ठरवले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img