8.7 C
New York

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: मंगळसूत्र, किराणा,अन् लाखाचा चेक! अंबानी कुटुंबाने ५० गरीब जोडप्यांना दिल्या ‘या’ भेटवस्तू

Published:

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. नव्या सुनेचं स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरु आहे. अवघ्या काही दिवसात अनंत-राधिका मर्चंटसोबत आयुष्याचे ७ फेरे घेणार आहे. त्यामुळे अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. २ जुलैला म्हणजे काल, मुकेश अंबानींनी लाडक्या लेकाच्या लग्नाआधी ५० गरीब जोडप्याचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. या सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबातल्या सदस्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. या सोहळ्याचे फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच मुकेश अंबानी यांनी २ जुलैला पालघर मधील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे सायंकाळी ४.३० वाजता ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने ५० जोडप्यांची लग्नगाठ बांधली. यावेळी तिथे स्वतः मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी पिरामल, आनंद पिरामल या सर्वांची उपस्थिती होती. अंबानी कुटुंबांनी प्रत्येक जोडप्याला भेटवस्तू देऊन आशीर्वाद देखील दिले. पण अंबानी कुटुंबांनी ५० जोडप्यानं नेमकं काय-काय दिलं? हे जाणून घेऊया…

माहितीनुसार, अंबानी कुटुंबाने प्रत्येकी जोडप्याला मंगळसूत्र, नथ, कानातले, अंगठी, आणि सोन्या-चांदीचे दागिने दिले आहेत. तसंच प्रत्येक जोडप्याला एक लाख एक हजाराचा चेकसुद्धा दिला. याव्यतिरिक्त वर्षभरासाठी पुरेसं किराणा सामान, घरात लागणाऱ्या वस्तू; ज्यामध्ये भांडी, मिक्सर, गॅस, गादी, अशा इत्यादी ३६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू अंबानी कुटुंबाने दिल्या. या मोठ्या विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी भव्य भोजन सोहळा आयोजन करण्यात आला होता. याआधी मार्च महिन्यामध्ये अंबानी कुटुंबाने जामनगर मध्ये अन्नसेव केली होती ज्यामध्ये ५१ हजार लोकांना जेवण देण्यात आले.

शर्वरी वाघचा बॉलीवूडमध्ये डंका! IMDbच्या यादीत ठरली नं १

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच १२ जुलैला हिंदू पद्धतीने लग्न होणार आहे. त्यानंतर शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम १३ जुलैला होणार असून १४ जुलैला मोठं रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीसोबत दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img