26.6 C
New York

National Doctors Day : आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात तज्ञ डॉक्टरांचा सत्कार

Published:

नवी मुंबई

आंतरराष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त (National Doctors Day) नवी मुंबई येथील इन मेजर सिटी संस्थेद्वारे (In Major City) आरोग्य धनसंपदा (Aarogyam Dhanasampada) 2024 हा कार्यक्रम सुनील कुमार प्रभाकरन (Sunil Kumar Prabhakaran) ह्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ, आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट असलेल्या डॉक्टरांचा सन्मान आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात करण्यात आला आहे. अशा प्रकारे कार्यक्रम घेण्याचे या संस्थेचे 11 वर्ष आहे.

नवी मुंबईतील इमेजेस सिटी संस्थेद्वारे आरोग्य धनसंपदा कार्यक्रम गेल्या 11 वर्षांपासून करण्यात येत आहे. यावेळी नवी मुंबई येथील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात सहभागी वैद्यकीय संस्था जसे, IMA-Navi Mumbai, Raigad Medico Asso., Kharghar Medico Ass., NIMMA-Navi Mumbai, BGA, HIMPA अश्या विविध संस्थांनी सूचित केलेल्या विशेष कार्यरत डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयुर्वेद व्यासपीठ नवी मुंबई द्वारे सूचित केलेल्या नवी मुंबईत आयुर्वेद क्षेत्रातील विशेष कार्य केलेल्या दोन वैद्यांचे विशेष सन्मान ही करण्यात आले. तसेच नवी मुंबई मध्ये आयुर्वेद क्षेत्रातील विशेष व्यावसायिक कार्यासाठी Dr. G D Pol Foundation’s YMT Ayurved Hospital & College, Navi Mumbai येरळा आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य संजीव यादव यांचा सन्मानित करण्यात आले. तर आयुर्वेद व्यासपीठ नवी मुंबईच्या संस्थापक सदस्या आणि जेष्ठ स्त्री वैद्या डॉ. संध्या घाटे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रायगड खोपोली कर्जत येथील ग्रामीण भागात कार्य केलेल्या तसेच नवी मुंबईच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून वैद्यकीय सुरू केलेल्या, आणि कर्म धर्म संयोगाने नवी मुंबईतच स्थिरावलेल्या आणि भरीव कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील डॉक्टरांची जीवनगाथा, संघर्ष आणि यशस्वी वैद्यकीय व्यवसायाचे मंत्र ऐकण्याची सुवर्ण संधी होती. व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारताना अनेक डॉक्टर भावूक होत.

सर्वच वैद्य, डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय कार्यास प्रेरक प्रसंग म्हणून अशा कार्यक्रमास जरूर उपस्थित रहायला हवे. आपापल्या क्षेत्रात विशेष कामगिरीसाठी पुरस्कार प्राप्त अशा नवी मुंबईतील अनेकांपैकी एक दोन उदाहरणादाखल नाव घ्यावीत तर डॉक्टर अंकुर पाटील (सर्वात जुने व सध्याचा सर्वात अद्यापत असे सोनोग्राफी सेंटर संचालक रेडियोलोजी तज्ञ) आणि डॉक्टर अशोक हांडे (ज्येष्ठ नामांकित न्यूरोसर्जन) यांनी त्यांचे मनोगत आणि सद्यस्थितीत चालू असलेले कार्य याबद्दल ही माहिती दिली. असे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वैद्य डॉक्टर्स कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्थानिक डॉक्टर संजीव नाईक यांच्या मार्गदर्शक भाषणाने आणि त्यानंतर राष्ट्रगीताने झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img