23.1 C
New York

Dudhsagar Waterfall: चहुबाजूने दूधगंगा! हा धबधबा पाहून भारावून जाल

Published:

Dudhsagar Waterfall: गोवा म्हणजे समुद्रचं समुद्र… असं म्हणतात. मात्र, गोव्याला (Goa) फिरायला जाण्याचा मोह सर्वानाच होतो मग ते उन्हाळ्यात असूदेत, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात. गोवा म्हटलं की समुद्राच्या लाटा आणि जंगी पार्टी आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते. आता गोव्यामधल्या विविध आणि वेगवेगळ्या ठिकाणांमधलं आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे दूधसागर धबधबा.(Dudhsagar Waterfall) भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे दूधसागर धबधबा. अगदी 320 मीटर उंचावरून पाणी खाली कोसळतं.

Dudhsagar Waterfall: दूधसागर हा धबधबा इतका सुंदर आहे की, तब्बल 310 मीटर उंचावरून पाणी खाली कोसळतं. भारतामध्ये सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी हा धबधबा पाचव्या क्रमांकावर येतो. गोव्यातील पणजीपासून रस्त्याने लागून 60 किमी अंतरावर असलेला मांडोवी येथे हा धबधबा आहे. दूधसागर धबधब्याच प्रमुख कारण म्हणजे धबधबा जवळून पाहिल्यावर जणूकाही दुधाच्या लाटा कोसळतायत असं वाटत आणि ते आपण पुन्हा पुन्हा पाहत आहोत असं भासत राहतं.

“मुंबईकरांनो मला हेल्प करा”, खुद्द रतन टाटा यांनी मुंबईकरांकडे केलं आवाहन…

दोन राज्यांच्या सिमेवर
गोवा (Goa) आणि कर्नाटक (Karnatak) या दोन राज्यांच्या सिमेवर दूधगंगा धबधबा आहे. पर्यटकांसाठी तिथे जाण्यासाठी फक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ आहे. या धबधब्याकडे पोहोचण्यासाठी संपूर्ण जंगलातून वाट काढावी लागते. धबधब्याचा पूर्ण परिसर समृद्ध जैवविविधतेने पानगळीच्या जंगलांनी वेढलेला आहे. भल्या मोठ्या घनदाट जंगलातून येथे पोहचण्यासाठी जीपसुद्धा उपलब्ध आहेत. जीपचा वापर करून तुम्ही धबधब्यापर्यंत पोहचू शकता. पणजीपासून हा धबधबा तब्बल ६० किलोमीटर अंतरावर आहे.

दूधसागर हे नाव कसं पडलं?
धबधब्याच्या खाली एक मोठा तलाव वसलेला आहे. या धबधब्याचं नाव दूधसागर पडण्यामागे एक वेगळीच कथा आहे. या कथेमध्ये सांगण्यात आलंय की, येथे एक राजकुमारी दररोज अंघोळ करायची. एक दिवस तलावात ती अंघोळ करत असताना एका तरुणाची नजर तिच्यावर पडली त्यावेळी राजकुमाराच्या मैत्रिणीने धबधब्यावर दूध ओतून दिले. दूध ओतल्यानंतर या धबधब्यातून राजकुमारी पुढे दिसेनाशी झाली. त्यामुळेच या धबधब्याचं नाव दूधसागर ठेवण्यात आलंय. आजही या धबधब्याची ओळख ही दूधसागर धबधबा अशी आहे आणि याच नावाने ओळखलादेखील जातो. दूधसागर धबधब्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला आधी गोव्यात जावं लागतं. तिथून पुढे पणजी आणि मग जीपच्या साहाय्याने तुम्ही या अतिशय सुंदर अशा दूधगंगा धबधब्याजवळ पोहचाल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img