4 C
New York

CM Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेतून मुस्लिमांना वेगळा ‘या’ पक्षाने केली मागणी

Published:

छत्रपती संभाजीनगर

राज्य सरकारचे राज्य सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात (Vidhan Sabha Monsoon Session) आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी (Women) महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojna) घोषणा केली आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या या योजनेतून मुस्लिम महिलांना (Muslim Women) वगळण्यात यावे अशी मागणी मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केली आहे.

प्रकाश महाजन म्हणाले की, राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.

प्रकाश महाजन म्हणाले की, राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.

लाभार्थ्यांचं आधार कार्ड

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं

पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी

पासपोर्ट आकाराचा फोटो

रेशनकार्ड

सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img