21 C
New York

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज

Published:

मुंबई

राज्य सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात (Monsoon Sessions) आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्य सरकारने (Government) राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक नवी योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojna) घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणच्या तहसील कार्यलयासमोर महिलांनी रांगा लावल्या होत्या. मात्र आता या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. यासाठी सरकारने नारीशक्ती दूत ॲप (Narishakti App) हे नवीन ॲप आणलं आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे हे ॲप होतं. मात्र आता नारीशक्ती ॲप पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. नारीशक्ती दूत असं या ॲपचं नाव आहे. हे ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लाडली बहीण योजनेच्या नारीशक्ती दूत ॲपमध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे. मात्र काही दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर बसल्या या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्याशिवाय तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवासी दाखल्याऐवजी आधारकार्डचा वापर करावा लागणार आहे.

तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. मात्र घर बसल्या मोबाईलवरूनही तुम्ही आता अर्ज करू शकता. यासाठी नारीशक्ती दूत ॲप तुम्हाला डाऊनलोड करावं लागेल.

फेटा आणि महिलेच्या चेहऱ्याचा प्रतिकात्मक फोटो असलेलं ॲप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा. ॲप ओपन झाल्यानंतर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करायची आहे. तुमचं नाव आणि इतर माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरीमध्ये आहे, याची माहिती भरावी लागेल. पुढे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरायची आहे. अर्जदाराचा फोटो जोडायचा आहे. त्यानंतर लागणारी कागदपत्र जोडून तुम्ही तुमचा अर्ज भरून पूर्ण होतो. त्यानंतर तुमचा अर्ज भरून पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img