19.7 C
New York

Bigg Boss OTT3: आईचं निधन, वडिलांची ३-४ लग्न, वडापाव गर्ल चंद्रिका झाली भावुक

Published:

Bigg Boss OTT3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या(Bigg Boss OTT3) तिसऱ्या सिझनमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितही (Chandika Dixit) सहभागी झाली आहे. चंद्रिकाला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून चाहतेही हैराण झाले होते. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये चंद्रिका दीक्षित ही चर्चेच्या चेहऱ्यापैकी एक आहे. गेल्या एपिसोडमध्ये चंद्रिकाने ‘बिग बॉस’च्या घरात स्वतःच्या आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे

Bigg Boss OTT3: चंद्रिकाने रणवीर शौरीबरोबर (Ranvir Shaurey) बोलताना तिच्या वडिलांबद्धल खुलासा केला आहे. चंद्रिका ६ वर्षाची असतानाच तिच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर वडिलांनी ३-४ लग्न केली. २०२२ मध्ये चंद्रिकाच्या वडिलांचं निधन झालं, लहानपणापासून तिच्या डोक्यावरून आईची छाया हरपली. आईच निधन झाल्यानंतर चंद्रिका तिच्या वडिलांसोबत राहत नव्हती, असं चंद्रिकाने सांगितलं. त्यानंतर रणवीर शौरी चंद्रिकाला विचारतो की, “आईवडिलांशिवाय तुला वाढवलं कोणी?” यावर उत्तर देत चंद्रिकाने वडिलांबाबत खुलासा केला आहे.

मंगळसूत्र, किराणा,अन् लाखाचा चेक! अंबानी कुटुंबाने ५० गरीब जोडप्यांना दिल्या ‘या’ भेटवस्तू

पुढे चंद्रिका म्हणाली,”आईच्या मृत्यूनंतर माझे वडील नशेच्या आहारी गेले होते. ते मला नातेवाईकांकडे सोडून जायचे. आईचं निधन झाल्यांनतर वडिलांनी ३-४ लग्न केली होती. मला कधी त्यांनी विचारलदेखील नाही.” चंद्रिकाच असं बोलणं ऐकून रणवीरसुद्धा आश्चर्यचकित झाला. यावर चंद्रिकाने त्याला म्हंटल की हेच माझं सत्य आहे. “मी माझ्या वडिलांचा खूप तिरस्कार करते. ज्यावेळी मला त्यांची सर्वात जास्त गरज होती त्यावेळी ते माझ्यासोबत कधीच नव्हते,” असंही चंद्रिका म्हणाली. आईच्या निधनानंतर आजीने सांभाळ केल्याचा खुलासा चंद्रिकाने केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img