मुंबई
भारतीय संघाने नुकतीच आयसीसी टी ट्वेंटी विश्व (ICC T20 World Cup) जिंकला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर असणार आहे. 6 जुलैपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर यानंतर भारतीय संघातील तीन दिग्गज खेळाडूंनी T20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाने झिम्बाब्वे (Zimbabwe) खेळले जाणारे टी-ट्वेंटीच्या पाच सामन्यांकरिता भारतीय संघामध्ये तीन नवीन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहेत. या संघात आयपीएल मध्ये चमकदार कामगिरी केलेल्या राजस्थान रॉयल्स खेळाडू रियान परागला (Riyan Parag) स्थान मिळाले आहे. यानंतर आपले भावना व्यक्त करताना परागने संघात निवड झाल्यानंतर पासपोर्ट आणि फोन विसरलो होतो असे बोलताना म्हटले आहे.
रियान पराग म्हणाला की, पासपोर्ट आणि मोबाईल हरवला असता तर खूपच अडचण झाली असती. माझं लहानपणापासून स्वप्न होतं की टीम इंडियाचे कपडे घालून ट्रॅव्हल करायचं. आता ते पूर्ण झालं आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात रियान परागला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 16 सामन्यात 573 धावा केल्या होत्या.
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यासाठी टीम
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.