8.7 C
New York

Rahul Dravid : पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी राहुल द्रविडने अर्ज का केला नाही?

Published:

T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. राहुल द्रविडने 2021 च्या अखेरीस टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला मोठं यशही मिळाले. त्यामुळे जर द्रविडची इच्छा असती तर तो पुन्हा एकदा भारतीय संघाचा कोच बनू शकला असता, मात्र त्याने अर्ज भरला नाही. यामागे नेमकं कारण काय होते ते आता बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठा खुलासा केला आहे.

आपण पुन्हा एकदा प्रशिक्षक पदासाठी अर्ज कौटुंबिक बांधिलकीमुळे भरू इच्छित नाही, मला प्रशिक्षकपदावरून त्यामुळे पायउतार व्हायचे आहे असं आपल्याला राहुल द्रविड यांनी सांगितलं असल्याच्या खुलासा जय शाह यांनी केला. राहुल द्रविड यांच्या या निर्णयाचा आपण आदर केला आणि त्यांच्यावर पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी मी कोणतीही जबरदस्ती केली नाही असं जय शाह यांनी सांगितलं. राहुल द्रविड यांनी साडेपाच वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. एनसीएचे ते तीन वर्षे संचालक होते आणि टीम इंडियाचे गेली अडीच वर्षे ते प्रशिक्षक होते असं म्हणत जय शाह यांनी राहुल द्रविड यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

संकट निवळलं, खेळाडूंच्या परतीसाठी BCCI कडून खास प्लॅनिंग

दरम्यान, राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ दोन वर्षांचा होता. 2023 मधील एकदिवसीय विश्वचषकनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत होता, परंतु बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक-2024 जवळ येत असल्याचे पाहून वाढवला. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला आणि बीसीसीआयचा हा निर्णय योग्य ठरला. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची जोडी चांगलीच जमली होती. दोघांचा स्वभाव शांत असल्याने एकमेकांना समजून घेणं त्यांना सोप्प पडलं. भारतीय संघावर त्याचा संपूर्ण परिणाम झाला आणि भारतीय क्रिकेट संघ राहुल- रोहित जोडगोळीने एक मजबूत तयार केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img