विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections)पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खुश करण्यासाठी (Government Schemes) महायुती सरकारनं अर्थसंकल्पिय अधिवेशनात (Budget sessions)मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Chief Minister Majhi Ladaki Baheen Yojana)घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नेमकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तरी काय? त्या योजनेसाठी कोण पात्र आहेत? त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? जाणून घेऊया…
Government Schemes योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Government Schemes योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार.
4) लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
Government Schemes योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1) रेशन कार्ड
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म दाखला.
4) उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते झेरॉक्स.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
Government Schemes योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.