17.6 C
New York

Stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरी 27 लोकांचा मृत्यू

Published:

उत्तर प्रदेश

भोलेबाबाच्या भक्तांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सत्संगात भाविक तल्लीन झाले होते. तेव्हाच अचानक चेंगराचेंगरीला (Stampede) सुरुवात झाली. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस शहरात सोमवारी सत्संग समारंभाच्या समारोप प्रसंगी भयंकर गर्दी झाली. या घटनेत 27 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक महिला व बालक जखमी झाले आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि अव्यवस्थित व्यवस्थापन यामुळे ही दुर्घटना घडली, अशी माहिती मिळाली आहे.

त्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गावात भोलेबाबाच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक पोहचले होते. या कार्यक्रम दरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली. यात काही जण पायाखाली आले तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत मयतांचा आकडा 27-28 वर पोहचला आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रात अनेकांना भरती करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेतील गंभीर भाविकांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मयताचा आकडा वाढण्याची भीती सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img