4.2 C
New York

Weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार, IMDचा इशारा!

Published:

राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार आहे. (Weather update) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुळसाधार पावसाची शक्यता मुंबई आणि पुण्याच्या घाट विभागात देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. पाच जुलैपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ५ जुलैपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. कोकण गोव्यात पुढील पाच ते सात दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

Weather update कोकण गोव्यात मुसळधार

कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज दोन तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी तीन व चार तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पाच तारखेला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मेधा पाटकर यांना ‘या’ प्रकरणात तुरुंगवास

Weather update विदर्भात यलो अलर्ट

पुढील पाचही दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित विदर्भामध्ये ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड व रत्नागिरी येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.नाशिक पुणे कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांमधील घाट क्षेत्रांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यलो अलर्ट त्यामुळे या जिल्ह्यांसाठीदेण्यात आला आहे.

Weather update पुण्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. व तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस घाट विभागात पडण्याची शक्यता आहे. घाट विभागासाठी त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे .

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img