23.1 C
New York

Dombivli : रिक्षाचालकांच्या समस्येसाठी भाजप रिक्षा चालक मालक संघटनेचे लाक्षणिक उपोषण

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

डोंबिवली शहराचा (Dombivli) विसर पडलेल्या कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) रिक्षाचालकांच्या समस्येवर कानाडोळा केल्याचे दिसते. भाजपा (BJP) रिक्षा चालक मालक संघटनेचे आवाज उठविला असून वारंवार सांगूनही आरटीओने कानाडोळा केला. अखेर संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी कल्याण आरटीओच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात सोमवार ८ तारखेला पूर्वेकडील इंदिरा चौक येथे एक दिवसीय लक्षणीक उपोषण व कल्याण शीळ रस्ता भागाजी वझे चौक येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत भाजपा रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर म्हणाले,कल्याण आरटीओचे अधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून बऱ्याच वेळा चर्चा केली. रिक्षा चालकांच्या अडचणी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. तरीही रिक्षा चालकांची कामे होत नाही.नियमात शासनाची फी भरून सर्व कागदपत्रे सादर केली असता अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ करण्यात येते. एक अधिकारी असताना रिक्षा चालकांची कामे होत होती.आता एक आरटीओ, दोन अे आरटीओ असतानाही रिक्षा चालकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येते. अधिकाऱ्यांच्या मलाईदार खाते वाटाघाटी मध्ये सर्वसामान्य नागरिक व रिक्षाचालक भरडल्या जात आहे. वारंवार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील ते जाणून-बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणून कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये सोमवार ८ तारखेला इंदिरा गांधी चौका येथे एक दिवशीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे. तर कल्याण शीळ रस्ता भागाजी वझे चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे, याधी 30 जानेवारी 2023 रोजी कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या नागरिक व रिक्षा चालकांच्या पिळवणुकीबाबत एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांची व रिक्षा चालकांची कशी लूट कल्याण आरटीओकडून करण्यात येते याचा दर फलक ही लावण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img