भाजपच्या नेत्यांनी आपले एकदा कान साफ करून घ्यायला हवेत. त्यांना नीट ऐकायला येत नसेल तर त्याची गरज आहे असा टोला लगावत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं जोरदार समर्थन केलं आहे. (Sanjay Raut) लोकसभेत बोलताना सर्व हिंदू समाजाला राहुल गांधी यांनी दु:खावलं अशी टीका भाजप नेते करत आहेत असा प्रश्न करताच राऊत भडकले. या सर्व लोकांना ऐकायला व्यवस्थित आलं नसेल तर त्यांनी आपले कान साफ करावेत असं राऊत म्हणाले. (PM Modi) ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, राहुल गांधी यांनी हिंदू व्याख्येबद्दल लोकसभेत भाष्य केलं आहे. हिंदू समाज हा मोठ्या संख्येने आहे. हिंदू समाजाची महती वेगळी आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणेज हिंदुत्व नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, आरएसएस म्हणजे हिंदू नाही हे स्पष्ट राहुल गांधींनी लोकसभेत सांगितलं आहे. याचा अर्थ ते सर्व हिंदू समाजाला बोलले असा होत नाही. त्यांनी फक्त भाजप आणि त्यांच्या नेत्यांबद्दल हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वांनी हे व्यवस्थित ऐकलं पाहिजे असंही राऊत यावेळी म्हणाले.
ठरलं..! ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची राजकारणात एन्ट्री
यावेळी राऊतांनी बोलताना राज्यातील भाजपचंही उदाहरण दिलं. ते म्हणाले, आम्हाला राज्यात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यामुळे राज्य भाजपचे नेते आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून टीका करतात. परंतु, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्याला उत्तर देताना सांगतात की आम्ही भाजपला सोडलं आहे हिंदुत्वाला नाही असं उदाहरण राऊतांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिलं. तसंच, भाजपवाल्यांना आम्ही म्हणजे हिंदू असं वाटत असेल तर ते साफ चूक आहे असंही राऊत यावेळी म्हणाले.