19.7 C
New York

PM Narendra Modi : PM मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ

Published:

नवी दिल्ली

संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषण धन्यावाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दुपारी लोकसभेत (LokSabha) उपस्थित झाले. दुपारी 4.10 मिनिटांनी पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळ सुरु आहे. यावरुन लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. संसदेच्या मर्यादांचे पालन करण्याचे आवाहन विरोधी पक्षाला करण्यात आले. मात्र ‘भारत जोडो’, ‘मणिपूर को न्याय दो’,च्या घोषणाबाजी काही थांबलेल्या नाही. या गदारोळातच पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली आहे.

विरोधकांनी मोदींच्या भाषणादरम्यान जोरजोरात घोषणााबाजी करत होते. हुकुमशाही बंद करा, हुकुमशाही बंद करा अशा घोषणा ते देत होते. त्याचबरोबर NEET च्या घोटाळ्यावर, मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करा अशी मागणी ते करत होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img