Sharvari Wagh: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले दिवंगत नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची नातं शर्वरी वाघ (Sharvari Wagh) ही नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा ‘मुंज्या’ (Munjya) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘मुंज्या’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई केली. ‘मुंज्या व्यतिरिक्त शर्वरी ही ‘महाराज’ (Maharaj) या चित्रपटातदेखील झळकली होती. दोन्हीसुद्धा चित्रपटांमधलं शर्वरीच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं आहे. अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत फार वाढ झाली आहे. अभिनेत्री शर्वरीने अव्वल MDbच्या Popular Indian Celebrities च्या यादीत स्थान मिळवलं आहे.
Sharvari Wagh: सध्या फक्त आणि फक्त शर्वरी वाघची चर्चा जोरदार रंगली आहे. अभिनेत्री म्हणून शर्वरीने तिचं अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) शर्वरीने मागे टाकलं आहे. शर्वरी वाघ पहिल्या स्थानावर आहे तर दीपिका पादुकोण दुसऱ्या स्थानावर आहे. दिशा पाटणी चौथ्या स्थानावर, दिग्दर्शक नाग अश्विन आहेत सातव्या स्थानावर, प्रभास आठव्या स्थानावर, अमिताभ बच्चन पंधराव्या स्थानावर, आणि कमल हासन १९व्या स्थानावर आहेत. याशिवाय पंचायत आणि कोटा फॅक्टरी सारख्या वेब सिरींजमधून फेमस झालेला अभिनेता जितेंद्र कुमार यालादेखील या यादीत 14 वे स्थान मिळाले आहे.
पहिल्या पत्नी सोबत अरमान मलिकचा होणार काडीमोड ? पायल म्हणाली…
शर्वरीने याबद्धल तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली की,’हे वर्ष माझ्यासाठी कसं गेलंय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. १०० कोटींच्या घरात प्रवेश करणाऱ्या ‘मुंज्या’ आणि ‘महाराज’ चित्रपटातली माझी विशेष भूमिका या सगळ्या मिळालेल्या प्रेमाबद्धल मी खरंच खूप कृतज्ञ आहे. MDbच्या Popular Indian Celebrities यादीत पहिल्या नंबरच स्थान मिळवणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी आणखी मेहनत करतेय आणि करणार, जेणेकरून मी खूप चांगल्या चांगल्या चित्रपटांचा भाग होऊ शकेन. माझं मन आणि माझं ध्येय एकाच ध्येयाच्या दिशेने दौडत आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीशी कोणताच संबंध नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी, प्रत्येक व्हिक्टरी मला नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणि चांगल्या भूमिका शोधण्यासाठी सक्षम करतेय’.
शर्वरी वाघ ही मुंबईतल्या एका मराठी कुटुंबात १४ जून १९९७ रोजी जन्माला आलेली राजकीय कुटुंबातली आहे. शर्वरी ही महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याची नात असून तिचे आजोबा हे महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री होते. शर्वरीच्या आजोबांचा राजकारणात चांगलाच दबदबा होता. शर्वरी वाघ ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नातं असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे आणि शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ आहे जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर शर्वरीची आई नम्रता ह्या आर्किटेक्ट आहे.