10.3 C
New York

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गसाठी निर्धार सभा संपन्न

Published:

मुंबई

मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) जनआक्रोश समितीने एक दिवस आपल्या मातीसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, पुढील पिढीच्या भवित्वासाठी, कोकणाचा शास्वत विकास घडविण्यासाठी अशी भावनिक साद घालत कोकणकरांना केलेल्या आवाहनानुसार काल २९ जुन रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातील सुरेन्द्र गावस्कर सभागृहात गेली १७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग संदर्भात निर्धार सभा संपन्न झाली.

या सभेला कोकणातील विविध संस्था संघटनांनी व समस्त कोकणकरांनी सहभाग घेत पायाभूत सुविधांच्या संवैधानिक हक्कांसाठी, कोकणकरांवर होत असलेल्या अन्यायविरूध्द आक्रोश प्रकट केला. या सभेस समृध्द कोकण ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव, शाश्वत कोकण परिषद आणि बारसु रिफायनरी आंदोलनांचे निमंत्रक सत्यजीत चव्हाण, कोकण युवा मंचाचे विकास निकम,कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर,खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवाचे संतोष निकम, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्थेचे सुनिल उत्तेकर, गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघाचे दिपक चव्हाण, संतोष अबगुल प्रतिष्ठानचे संतोष अबगुल, महाराष्ट्र संरक्षण संघटनाचे सुमित हेरेकर, गुरुरविदास स्वाभिमानी युवा संघचे दिपक खोपकर,
वृत्त मानस पत्रकारचे अनंत दाभोलकर, सिंधुदुर्ग नाभिक बांधव संघटना मुंबईचे हेमंत वालावलकर, समर्थ जनाधार प्रतिष्ठानचे विनोद मोहिते,गडगडी धरण कृती समितीचे संतोष घाग,माय भूमी फाउंडेशनचे अनंत काप, रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे आदेश लाड, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणेचे राजू कांबळे, यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबईचे विठोबा महाडीक, रावमंडन वाडी उत्कर्ष मंडळ कारवलीचे सुरेश डाळवे, पितामह रामजी नगर सेवा संघचे गणेश डिगे,उत्कर्ष मंडळ चोरगेचे संतोष आंब्रे, टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे संजय सावंत, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🛑सर्व कोकणकरांच्या उपस्थितीत आणि वरील सर्व संघटनांच्या संमतीने खालील ठराव मान्य करत निर्णायक भुमिका घेण्यात आली

🛑मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १७ वर्षापासून रखडलेले आहे, या महामार्गाच्या कामाच्या प्रगतीमधील प्रशासनाची दिरंगाई व निकृष्ट दर्जा विघ्न, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी २८ जुलै २०२४ रोजी माणगाव बायपास येथे शांतीहोमहवन करण्यात येणार आहे.

🛑कोकणकर मुंबई गोवा महामार्गासाठी गेली १७ वर्ष लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे दाद मागत विनवण्या करत होतो परंतु आता कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडुन अपेक्षा न धरता १५ ऑगस्ट २०२४ पासून “बेमुदत आमरण उपोषण” माणगाव येथे करण्याचे ठरले आहे,यामध्ये कोणत्याही आमदार, खासदार यांचे आश्वासन न ऐकता प्रत्यक्षात जलद गतीने काम सुरु होत नाही व मुख्यमंत्री स्वतः खड्ड्यातून प्रवास करीत आंदोलन स्थळी पोहचणार नाहीत तो पर्यंत हे आंदोलन चालु राहील.

🛑राज्यातील इतर विभागातील लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्येसाठी आपले पक्ष बाजूला ठेऊन एकमताने रस्त्यावर उतरतात तर इतर मतदार संघातील आमदार महामार्गावर विधान परिषद मध्ये आवाज उठवतात परंतु कोकणातील लोकप्रतिधी बघ्याची भुमिका घेतात त्यांना जागे करण्यासाठी त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

🛑येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवेळी बहिष्कार टाकणे व कोकणप्रातांतील मुंबई ठाणे पालघरसहित सर्व ६ जिल्हातील तालुका प्रत्येक गावागावात व घराघरात जाऊन निवडणुकीवर बहिष्कारबाबत जनजागृती करणे.

🛑कोकणात लोकसभेला आम्ही ०२ दिवस सोशल मीडियाद्वारे प्रसार केला तर ३७,०००/- मत कोकणात नोटाला पडली, यावेळेस काम करण्यास अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना मत न देता नोटाला मतदान करणे, जेणेकरून कोकणातील जनतेची ताकद नेत्यांना नोटाच्या माध्यमातून कळेल, असे ठरविण्यात आले.

वरील एकमताने ठरलेले सर्व निर्णय व निर्णायक भुमिका गावागावात आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम सोशल मिडियाव्दारे जनजागृती स्वाक्षरी मोहीम व प्रत्यक्षात संपर्क व संवाद साधत भेटी घेऊन करण्यात येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img