16.7 C
New York

Melghat Bus Accident : मेळघाटात खासगी ट्रॅव्हल दरीत कोसळली

Published:

अमरावती

अकोट मधून (Akot) मेळघाटात प्रवासी घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल दरीत कोसळली. सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील (Melghat Bus Accident) खटकालीजवळील हाय पॉईंट जवळ ही बस दरीत कोसळली आहे. यामध्ये 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोट वरून धारणी येथे ट्रॅव्हल येत होती.अकोट -धारणी मार्गावरील खटकाली फाट्यावरील जवळ ही घटना घडली.

बस सातपुडा पर्वत रंगात आकोट धारणी घाटातून जात असताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली. घटनास्थळी अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका तात्काळ रवाना झाल्या. जखमी प्रवासींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून प्रशासनाने आपत्कालीन सेवा तत्काळ उपलब्ध करून दिली आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना केल्या जाण्याची गरज आहे.

अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून 8 ते 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, बसमधील सर्व लहान मुलं सुरक्षित आहेत. जखमींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉईंट जवळ खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळली आहे. अकोल्यातील अकोट शहरातून ॲम्बुलन्स आणि एकलव्य बचाव पथकासह वनविभाग घटनास्थळी दाखल झाले होते. सदर घटना अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img