21 C
New York

Prasad Lad : दानवेंचे तत्काळ निलंबन करा, शिवीगाळ प्रकरणी प्रसाद लाड यांची मागणी

Published:

मुंबई

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याबाबत विधिमंडळात अपशब्द वापरले. दानवे यांच्या याच शिवराळ भाषेवर आज प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ते आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकटेच आंदोलन करत होते. लाड यांच्या या भूमिकेनंतर आजचे विधिमंडळातील कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी, दानवे यांच्याविरोधात आज घोषणा केली. सुरुवातीला प्रसाद लाड यांनी एकट्यानेच दानवे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले. नंतर सत्ताधाऱ्यांनी राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभा पायऱ्यांवर ठिय्या दिला. आज हा मुद्दा विधानपरिषदेसह विधानसभेत गाजण्याची दाट शक्यता आहे.

माझ्या आईबद्दल एका विरोधी पक्षनेत्याने अपशब्द काढले आहे. उध्दव ठाकरेंना शोभते का? शिव्या देण हे माहाराष्ट्राची संस्कृती आहे का?विरोधी पक्षनेत्याची निंलबन झाले पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा घेतला पाहिजे, माझ्या आईची माफी मागितली पाहिजे. उध्दव ठाकरेंनी त्याला जाब विचारला पाहिजे. शिक्षा एका दिवसाची किंवा एका तासाची झाली पाहिजे.

ज्या मातोश्रींबद्दल आम्ही म्हणतो. कैलाशवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या पत्नी होत्या. त्यांना तमाम महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा. त्यांचा पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नेता जेव्हा अशा शिव्या देतो. त्यावेळी त्याला प्रश्न विचारला का? असा प्रश्न मला उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे. माझ्या आई-बहिणीचा अपमान केला गेला, असं ते म्हणाले.

दानवे म्हणाले माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत. मी मारून टाकेन, कापून टाकेन याच्यावर मला भाष्य करायचं नाही. पण, आम्ही सुद्धा परळ-लालबागसारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला, हिंदूत्वाचा उगम झाला अशा ठिकाणी आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. सुसंस्कृत असल्याने जशाच तसे मी उत्तर दिलं नाही, असं लाड म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img