26 C
New York

MLC Election : ठरलं..! ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची राजकारणात एन्ट्री

Published:

विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी (MLC Election) सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. आता विधानपरिषदेच्या या निवडणुकीत वेगळे डावपेच टाकण्याचा प्रयत्न होत आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पराभूत झालेले किंवा तिकीट न मिळालेल्या असंतुष्टांना तसेच निकटवर्तीयांना तिकीट देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून होत आहे. आताही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू मिलींद नार्वेकर यांना विधानपरिषदेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अखेरची मुदत आहे. तेव्हा आज दुपारी नार्वेकर (Milind Narvekar) अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळाली. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सगळ्याच राजकीयप पक्षांकडून होत आहे. तेव्हा आता कोणाचे अर्ज दाखल होतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मिलींद नार्वेकर यांना संधी मिळाली तर नार्वेकर यांची ही संसदीय राजकारणातली एन्ट्री ठरणार आहे. कारण आतापर्यंत ते यापासून दूर होते. सध्या ते शिवसेना उबाठा पक्षाचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षांपासून ते ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत फूट पडल्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात अनेक मोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यातील बऱ्याच नेत्यांनी पक्ष सोडताना मिलींद नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्यामुळेच आम्ही शिवसेना सोडली असे अनेकांनी जाहीरपणे सांगितले होते.

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांनी जारी केली ‘ही’ नियमावली

मध्यंतरीच्या काळात लोकसभा निवडणुकीआधी नार्वेकरांना शिंदेसेनेने पक्ष प्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा रंगली होती. दक्षिण मुंबई मतदारसंघातून त्यांना तिकीट देण्याची शिंदे गटाची योजना आहे असेही बोलले गेले. मात्र, या फक्त चर्चाच होत्या त्यात काहीच तथ्य आढळलं नाही. मिलींद नार्वेकर सध्या पक्षाचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आहेत. मुंबई टी 20 लीगचे अध्यक्षही आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान मंडळाचेही सदस्य आहेत. यानंतर आता मिलींद नार्वेकर संसदीय राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत.

MLC Election कुणाकडं किती संख्याबळ?


महायुती

भाजप 103
शिंदे गट 37
राष्ट्रवादी अजित पवार 39
अन्य पक्ष 9
अपक्ष 13
एकूण 209

मविआ

काँग्रेस 37
ठाकरे गट 15
राष्ट्रवादी शरद पवार 13
शेकाप 1
अपक्ष 1
एकूण 67

एमआयम 2, सपा 2, माकप, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक असे एकूण 6 आमदार तटस्थ आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img