5.5 C
New York

Bigg Boss OTT3: पहिल्या पत्नी सोबत अरमान मलिकचा होणार काडीमोड ? पायल म्हणाली…

Published:

Bigg Boss OTT3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Bigg Boss OTT3) शोमधून युट्युबर पायल मलिक (Payal Malik) नुकतीच बाहेर पडली आहे. पहिल्याच आठवड्यात पायलचा ‘बिग बॉस’मधला प्रवास संपला आहे. आता बाहेर पडताच पायल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. युट्युबर अरमान मलिकने (Arman Malik) पायलला घटस्फोट न देता कृतिका मलिक (Krutika Malik) म्हणजेच दुसरी पत्नी हिच्यासोबत लग्न केलं. धक्कादायक बाब अशी की, पायल आणि कृतिका या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. यामुळे अरमान- कृतिका यांच्यातदेखील चांगलीच मैत्री झाली. जेव्हा अरमानने कृतिका सोबत लग्न केलं तेव्हा खरा मोठा धक्का पायलला बसला. अशातच चाहत्यांमध्ये पायल आता अरमानला घटस्फोट देणार का? इतरांनी तर, पायल हिने आता अरमानपासून विभक्त झालं पाहिजे… असा सल्ला देखील पायलला दिला आहे.

Bigg Boss OTT3: आता पायलने तिच्या २ मुलांसोबत व्लॉगिंगच्या विश्वात पाऊल ठेवायला हवं, पायलने अरमानला घटस्फोट देत स्वतःची एक चांगली ओळख निर्माण करण्याची गरज आहे. असं देखील बरेच जण बोलत आहेत. मात्र, पायल हिला याबद्धल विचारण्यात देखील आलंय. यावर पायल म्हणाली की,’ मी कधीच अरमानला घटस्फोट देणार नाही…’यामागचं कारणसुद्धा पायलने सांगितलंय. पायल म्हणाली, ‘आमच्या दोघांचा घटस्फोट कधीच होणार नाही कारण मला कधीच नाही वाटत की अरमान माझ्यात आणि कृतिकामध्ये कधी फरक करतो. किंवा माझ्यावर जास्त कृतिकावर कमी प्रेम करतो असं अजिबात नाहीये. अरमानसाठी आम्ही दोघी आणि आमची ४ मुलं सर्वकाही समान आहेत. माझ्या डोक्यात घटस्फोटाबद्धलचे विचार कधीच येत नाहीत. मला कितीही प्रसिद्धी मिळाली तरी… माझ्याकडे अफाट पैसा जरी आला तरी देखील मी कधीच अरमानपासून विभक्त होणार नाही.’

सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या 5 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

‘मला सर्वकाही माहिती आहे की, मी सगळ्या गोष्टींसाठी आर्थिकदृष्टया सक्षम आहे. माझ्याकडे आज एवढा पैसा आहे ना की, आज मी वेगळी जरी झाली तरी, पैसा बक्कळ कमावू शकेन. पण मला त्या दिशेनं जायचं नाही आहे. मी माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या मुलांसोबत खूप आनंदी आहे. माझं अरमानवर खूप प्रेम आहे.’ इतकंच नव्हे तर, ‘बिग बॉस’ने परत एकदा बोलावलं तर मी जाईन… असंसुद्धा पायलने म्हंटल.

पायल मलिकबद्धल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर पायलच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. पायल नेहमीच सोशल मीडियावर स्वतःचे आणि कुटुंबाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहतेसुद्धा पायलच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत असतात किंवा तिला सल्ला देत असतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img