23.1 C
New York

Uddhav Thackeray : दानवेंच्या निलंबनानंतर ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Published:

मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना पाच दिवसासाठी सभापती यांनी निलंबित केले आहे. यावरून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तापण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनावर प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकारसह भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, खरंतर अंबादास दानवे यांना भूमिका मांडण्यासाठी संधी द्यायला हवी होती. त्यांना वेळ द्यायला हवी होती पण वेळ देण्यात आली नाही. आम्हाला कुणाला बोलू दिलं गेलं नाही. जणू काही सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं आहे. हे असं कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झाला असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्राची जनता डोळे उघडून पाहते आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला कल्पना आहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित केलं गेलं आहे. खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर, माझ्या बाजूला दोन्ही विधीमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं. त्याचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. निलंबन करण्याचा अधिकार हा अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो. पण त्यासाठी एकतर्फी निर्णय, एका कुणाकडून मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे, हा लोकशाहीच्या विरोधातील निर्णय आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा काल शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. तो विजय झाकाळून टाकण्यासाठी त्यांनी निलंबनाचा निर्णय घेतला. म्हणजे आमच्या विजयाच्या बातम्या दाबून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच जो बोगस अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली आहे. लोकांना सुद्धा कळलं आहे की, ही धूळफेक आहे. निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं हे गाजर आहे. त्याची चिरफाड करायला अनेक तज्ज्ञांनी आणि आम्ही सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला एका वेगळ्या मुद्द्याकडे न्यायचं असा प्रयत्न सुरु आहे. म्हणून आकसाने विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलं गेलं आहे. याचा आम्ही निषेध करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण जनेतेने हे पाहावं, तुमचा आवाज मांडताना विरोधी पक्षाला निलंबित केलं जात असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? वातावरण खूप वाईट आहे. या निमित्ताने मी परत एकदा सांगतो, येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही एकत्र एका ताकदीने लढवू असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img