पुणे
पावसाळ्यात पर्यटकांना लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी स्थळे आकर्षित करत आहेत. त्यामुळे अशा स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या २ दिवसांपूर्वीच लोणावळ्यातील भूशी डॅम धबधब्यात एक कुटुंब वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरातील धबधब्यावर अन्सारी सय्यद यांच्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. त्या परिसरात पर्यटन बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळ्यातील (Lonavala) अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय जिथून वाहून गेले. त्या परिसरात आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर प्रशासनाने विशेष नियमावली लागू केली आहे.
अन्सारी आणि सय्यद कुटुंब ज्या ठिकाणाहून वाहून गेले त्या परिसर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लोणावळा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण परिसर 31 ऑगस्ट पर्यंत पर्यटकांसाठी बंद असणार आहे. तसेच प्रशासनाने इतर प्रतिबंधात्मक आदेश देखील या परिसरासाठी लागू केले आहे. लोणावळ्यात संध्याकाळी सहानंतर पर्यटन स्थळे फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तिबंधात्मक आदेश कुठं आणि कसे लागू असतील?
सहारा पुलावर वाहने पाकींग करण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोटया धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
भूशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून वरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
भूशी धरणाच्या west weir च्या डाव्या बाजूने वन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
लायन्स पॉईट / टायगर पॉईट शिवलिंग पॉईट येथे सायंकाळी 6 वाजलयापासून सकाळी 6 पर्यंत
मावळ तालुक्यातील सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील तीन छोटे धबधबे, भूशी डॅम, भूसी डॅम रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊस वरचा भाग, भूशी डॅम येथील west woir च्या वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पॉईट, शिवलिंग पॉईंट इत्यादी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील काही धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे.