आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी (Teachers Constituency) होणार आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमधील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात (Nashik) ही मतमोजणी होणार आहे. (Teachers Constituency) शिक्षक आमदार कोण होणार याचा फैसला आज होत असून, नेमकं कोण गुलाल उधळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Teachers Constituency २१ उमेदवारांचं भवितव्य
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी (दि. २६ जून)रोजी मतदान झालं होतं. गेल्या आठवड्यात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांत मतदान घेण्यात आलं. विभागात ९३.४८ टक्के शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत २१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद केलं. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केलं.
Teachers Constituency कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
गेल्या आठवड्यात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांत मतदान झालं. विभागात ९३.४८ टक्के शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत २१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद केलं. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदागतवेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याने मतदारांमध्ये निकालाची उत्सुकताही वाढली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आज, सोमवारी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. एकाच ठिकाणी पाचही जिल्ह्यांची मतमोजणी होणार आहे.
सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव
Teachers Constituency डॉ. गेडाम यांची पाहणी
निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गडाम यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं असून, २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया वेळखाऊ राहणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची खबरदारी घ्या, अशा सूचना गेडाम यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखली याशिवाय जाईल याची काळजी घ्या, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जळगावचे जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अपर आयुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर व विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
Teachers Constituency मतमोजणी कक्षात मोबाइलला बंदी
सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. वखार महामंडळाच्या गोदामाच्या परिसरात मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष तयार करण्यात आला आहे. ३० टेबलांवर मोजणीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. येथील प्रकाशव्यवस्था, वीजपुरवठा, आरओ, एआरओ बैठकव्यवस्था, उमेदवारांसाठी बैठकव्यवस्थेसह आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी राहणार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांनी जबाबदारी दिलेल्या ठिकाणीच थांबावं, तसंच उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींनीदेखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Teachers Constituency …अशी आहे तयारी
-मतमोजणीसाठी ९० अधिकाऱ्यांची नियुक्ती
-सकाळी आठपासून मोजणी प्रक्रियेला सुरुवात
-विभागातील प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येकी सहा याप्रमाणे ३० टेबलांची व्यवस्था
-प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, दोन मतमोजणी अधिकारी नियुक्त
-प्रत्येकी सहा टेबलची जबाबदारी एका जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार
-विभागातील पाचही जिल्हाधिकारी मोजणीला राहणार उपस्थित
-मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पाचही जिल्ह्यांच्या मतपत्रिकांची होणार सरमिसळ
-मतपत्रिकांचे ५०-५० चे गठ्ठे तयार केले जाणार
-या गठ्ठ्यांमधून वैध आणि अवैध मतपत्रिका बाजूला केल्या जाणार
-वैध मतपत्रिकांचे प्रत्येकी एक-एक हजारांचे गठ्ठे केले जाणार
-वैध मतपत्रिकांच्या आधारे विजयासाठीचा कोटा निश्चित होणाररांनी मतदान केलं.