23.1 C
New York

Rohit Pawar : ‘हा’ खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले

Published:

नीट पेपर फुटीवरून आज विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. यावेळी रोहित पवारांनी राज्याचे गृहमंत्री सभागृहात पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय असे म्हणत असून, गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही नेमकं कुणाला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहात? असा सवाल केला. त्यामुळे पेपर फुटीवरून फडणवीस आणि राहित पवार यांच्या तु-तु-मै-मै होत शाब्दिक खटके उडाले. (Rohit Pawar Aggressive On Paper Leak Issue Devendra Fadnavis Answered )

Rohit Pawar काय म्हणाले रोहित पवार?

पेपरफुटीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, गृहमंत्री बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आली ती अपुरी आहे असं सांगत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली. पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी आम्ही आंदोलन केले, उपोषण केले आहे. केंद्र सरकारने जो कायदा आणला त्याचे स्वागत आहे. त्यातही काही त्रुटी आहेत. या अधिवेशनात पेपर फुटीचा कायदा आणला जावा. हा युवकांच्या भवितव्याचा विषय असून महाराष्ट्र राज्य पेपरफुटीचा कायदा या अधिवेशनात काढणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज्यातील युवा तुमच्याकडे मागणारच….. आम्ही युवांसोबत आहोत… काहीही झालं तरी या अधिवेशनात पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करावाच लागेल.

थोरातांना उत्तर देत फडणवीसांनी फटकारले

Rohit Pawar कुणाला वाचवण्याासाठी खोटं बोलत आहात?

राज्यात पेपरफुटीमुळे युवांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे अन् राज्याचे गृहमंत्री सभागृहात म्हणतात की, पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित करत पेपरच फुटले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? असे रोहित पवार म्हणाले. नेमकं गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही कुणाला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहात? असा खडा सवाल रोहित पवारांनी फडवीसांनी केला.

Rohit Pawar आम्ही गडबडीचा प्रयत्न हाणून पाडला

रोहित पवारांना उत्तर देताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचं असून, 1 लाख लोकांना नियुक्ती देताना राज्य सरकारने पारदर्शक काम केलं आहे. गडबड करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाला, तो प्रय़त्न हाणून पाडला. केंद सरकारने कायदा केल्यानंतर पेपर फुटीचा राज्य सरकारने हा कायदा तयार करावा यासाठी मागच्या अधिवेशनातच निर्णय घेतला आहे. सध्या यावर प्रक्रिया सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img