16.3 C
New York

LPG Cylinder Price Cut : व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा

Published:

तेल कंपन्यांनी महागाईपासून काहीसा दिलासा दिला आहे. (LPG Cylinder Price Cut) तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आज सोमवार (दि. 1 जुलै)रोजी एलपीजी (L PG) सिलिंडरच्या किमतीत बदल करून तो 30 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडरचे दर 30-31 रुपयांनी कमी झाले आहेत, ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू आहे.

LPG Cylinder Price Cut 30 रुपये स्वस्त

दरम्यान, सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरऐवजी व्यावसायिक सिलिंडरवर दिलासा देण्यात आला आहे. याचा अर्थ रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना या कपातीचा फायदा होईल. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीपूर्वी व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरच्या किमती सुधारित करत असून नवीन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेपासून लागू करण्यात येतो. जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले आहेत. पण घरगुती सिलिंडरचे दर कमी झाले नाहीत.

कोण होणार शिक्षक आमदार?, नाशिक विभागात आज मतमोजणी

LPG Cylinder Price Cut सिलिंडरचे दर बदलण्याची कारणे

मागणी-पुरवठा गतिशीलता
कर धोरणात बदल
आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत बदल होणे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img