17.3 C
New York

New Criminal Laws : नवीन कायद्याबाबत ओतूर पोलीसांच्यावतीने जनजागृती

Published:

ओतूर,प्रतिनिधी: रमेश तांबे

ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील शरदचंद्रजी पवार इंजीनियरिंग कॉलेज ओतूर ( डुंबरवाडी ) येथील विद्यार्थ्यांना देशात आजपासून (New Criminal Laws) नवीन फौजदारी तीन कायदे लागू झाल्याने ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्यावतीने नवीन कायद्याची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता हितीपर कार्यक्रम घेण्यात आला.

 आज सोमवारपासून देशभरात तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत. यामुळे भारताच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. तसेच जुने ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार होणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशात लागू होतील. हे कायदे ब्रिटिश काळातील आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यात मोठे बदल करण्यात आले असून हे तिन्ही नवे कायदे आधुनिक न्याय प्रणाली स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावतील, असा सत्ताधारी भाजपचा दावा आहे.

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांनी जारी केली ‘ही’ नियमावली

१) भारतीय दंड संहिता १८६०( आयपीसी  ) चे रूपांतर भारतीय न्याय संहिता २०२३ ( बी.एन.एस )
२) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३  ( सीआर.पी.सी ) चे रूपांतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ ( बीएंन एस एस )
३) भारतीय पुरावा कायदा १८७२ ( आय.ई. ए ) चे रूपांतर भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ( बी.एस.ए ) मध्ये झाल्याबाबत माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद खरात सर,डॉ.सुनिल खताळ,डॉ.पुजा घोलप,प्रा राहुल बनसोडे प्रा.सचिन जाधव प्रा.निता बानखेले, कार्यालयीन अधीक्षक विशाल बेनके,प्रा. सिद्धार्थ पानसरे आदी प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी व पोलीस कर्मचारी हे हजर होते. प्रास्ताविक प्राचार्य गोविंद खरात यांनी केले तर आभार डॉ.पुजा घोलप यांनी मानले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img