4 C
New York

Monsoon Session : विधानसभेत राणे-राऊत यांच्यात शाब्दिक चकमक

Published:


मुंबई

घाटकोपर छेडानगर येथे १३ मे रोजी अवाढव्य जाहिरात होर्डिंग कोसळून (Ghatkopar hoarding case) १७ जणांचा दुर्देवी म़त्यू झाला होता. या प्रकरणाची निव़त्त न्यायाधीशांमार्फत चौकशी सुरू आहे. एमएमआरमधील (MMR) सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. जे निकषात बसत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत (Monsoon Session) स्पष्ट केले. होर्डिंगबाबतचे धोरण तयार असून आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच ते हरकती आणि सूचनांसाठी खुले करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या होर्डिंग प्रकरणातील दोषी भावेश भिंडेंचा माजी मुख्यमंत्री उदधव ठाकरेंसोबत फोटो कसा काय असा सवाल करत भाजपा आमदार राम कदम यांनी उदधव ठाकरेंची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. कोविड काळातच माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या नावाखाली होर्डिंगवाल्यांसोबत मोठया प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असून यामागच्या कटकारस्थानाची चौकशी करण्यात यावी असे आशिष शेलार म्हणाले. हे सर्व मुददे निव़त्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीला दिले जातील असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. या प्रकरणी केवळ कैसर खालिद या पोलीस अधिका-यावर कारवाई करून चालणार नाही तर दोषी असणा-या महापालिका अधिका-यांवर देखील कारवाई झाली पाहिजे असे जितेंद्र आव्हाड यांनी ही लक्षवेधी उपस्थित करताना म्हटले. भाजपा आमदार राम कदम म्हणाले, मुळात कोविड काळातच या होर्डिंगला परवानगी मिळाली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्यासोबत भावेश भिंडेचा फोटो आहे. मातोश्री येथे कोविड काळात मंत्रयांना पण तत्कालिन मुख्यमंत्री भेटत नव्हते. मग हा भिंडे कसा काय भेटला. राजाश्रय असल्याशिवाय होर्डिंगची परवानगी मिळूच शकत नाही. होर्डिंगच्या मालकाला कोणाचा राजाश्रय होता याची चौकशी करा. गरज लागली तर उदधव ठाकरेंची पण चौकशी केली पाहिजे असे राम कदम म्हणाले. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे कटकारस्थान असल्याचा आरोप करताना आशिष शेलार म्हणाले, आधी ज्यांची महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती त्यांनी होर्डिंगबाबत नवीन धोरण येणार म्हणत वातावरणनिर्मिती केली होती. त्यानंतर होर्डिंग वाल्यांशी तत्कालिन सरकारमधील लोकांनी बैठका घेतल्या. कोविड जाग़तीसाठी काही जाहिरातींची गरज होती. तेव्हा माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या नावाखाली होर्डिंगवाल्यांसोबत देवाण घेवाण झाली. छोटया आकारातील होर्डिंग मोठी करायला सांगितले. नुकसान होत असल्याच्या नावाखाली होर्डिंगवाल्यांना लायसन्स फीमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आली. युवानेत्यांमुळे डिजिटल साईनबोर्ड सुरू झाले. आता आयआयटीने अहवाल दिला आहे की या डिजिटल बोर्डमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडथळा निर्माण होत आहे. या सर्व कटकारस्थानाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

नितेश राणे-सुनिल राऊत आमने सामने
या लक्षवेधीच्या वेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांच्यात शाब्दिक चकमक झडली. भावेश भिंडे हा सुनिल राऊत यांचा पार्टनर असल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला. कोविड काळात मातोश्रीवर आमदारांना प्रवेश नव्हता, मग या भिंडेला तिथे घेउन जाणारा आमदार कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी भिंडेचा सीडीआर तपासण्यात यावा असे नितेश राणे म्हणाले. त्यावर सुनिल राऊत यांनी माझा भिंडेसोबत एक रूपयाचा जरी व्यवहार सिदध झाला तर मी इथल्या इथे राजीनामा देईन, नसेल तर आरोप करणा-याने राजीनामा दयावा असे आव्हान नितेश राणे यांना दिले. उलट भावेश भिंडे ज्या दिवशी पळाला त्या दिवशी त्याला शेवटचे जे चार फोन आले ते मुलुंडच्या माजी खासदाराने केले होते असा आरोप सुनिल राऊत यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img