28.9 C
New York

Pune : पुण्यात नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Published:

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (India) ज्यामध्ये वाहतूक नियोजन करणारा बनावट पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतय. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात (Viral video) भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. या विजयानंतर पुण्यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोठा जल्लोष केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.

Pune संताप व्यक्त

या व्हिडिओमध्ये एक बनावट पोलीस गाडीवरील तरुणांना आपल्या हातातील बंदूकीने मारत आहे. त्यामध्ये ती बंदुकही तुटल्याचं पाहायला मिळाल. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर युजर्सनी या प्रकरावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत टीका केली आहे.

व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा

Pune बनावट पोलीस

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कारवाई करत विश्रामबाग पोलिसांनी दारूच्या नशेत पोलीस अधिकारी असल्याचं भासवून नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आयपीसी कलम 420, 170 आणि महाराष्ट्र मद्य कायदा कलम 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा बनावट पोलीस असल्याचं समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img