16.3 C
New York

Diksha bhoomi nagpur : दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंग विरोधात, आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन

Published:

आंबेडकरी संघटनांनी नागपूर येथील दीक्षाभूमी (Diksha bhoomi nagpur) येथील भूमिगत पार्कींग जोरदार विरोध करीत आंदोलन सुरु केले आहे. या भूमिगत पार्कींग योजनेमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बांधकामाला विरोध करीत जाळपोळ सुरु केली आहे. आणि भूमिगत पार्किंगचे बांधकाम सुरु असलेल्या जागेवर हल्लाबोल करीत जोरदार आंदोलन सुरु केले आहे.

Diksha bhoomi nagpur त्यामुळे येथील भूमिगत पार्किंगला विरोध

डॉ. बाबासाहेब यांची प्रेरणाभूमी आहे. ही जागा जगभरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरातील अनुयायासाठी प्रेरणास्थान आहे. जमिनीच्या वर बीम का उभे केले जात आहेत.हे कळण्यापलिकडे नाही. त्यामुळे येथील भूमिगत पार्किंगला विरोध सुरु झाला आहे. शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्मारक समितीची भूमिका समजू शकलेली नाही असे म्हटले आहे.

‘हा’ खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले

Diksha bhoomi nagpur प्रकाश आंबेडकर यांचाही विरोध

या भूमिगत पार्कींगला विरोध होत आहे. आधीपासूनच अंडरग्राऊंड तीन मजली पार्किंगचे कामाला विरोध आहे. कारण येथील लोकांनी पार्किंगची मागणी केलेली नाही. त्यामुळे या दीक्षाभूमीला धक्का बसेल असे कोणतेही बांधकाम केलेले नाही. त्यामुळे या आंदोलकांना आमचा पाठिंबा असल्याचे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Diksha bhoomi nagpur दीक्षाभूमीचे महत्व काय

14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. दीक्षाभूमीत भूमिगत पार्कींगमुळे स्तूपाला धोका असल्याचे आंबेडकर अनुयायींचे मत आहे. स्मारक समितीच्या या सर्व विकास योजनांमुळे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या अस्तित्वाला धोका असल्याचे आंबेडकरी अनुयायांचे म्हणणे आहे. ‘धम्मचक्र प्रवर्तन दिनी’ येथे जगभरातील अनुयायी येत असतात. येथील स्तूपात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे जतन देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे जगभरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माला मानणाऱ्या जनतेच्या भावना यासंदर्भात तीव्र आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img