आज विधानपरिषदेत कधी न पाहिलेला असा गदारोळ पाहायला मिळाला. अंबादास दानवे (Ambadas Danve) विधानपरिषदेत आक्रमक होताना दिसले. भाजप आमदार प्रसाद लाड यांना आज विधानपरिषदेत अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली. या सर्व प्रकारानंतर माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, “माझा तोल सुटलेला नाही. माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार आहे. मी विरोधी पक्षनेता नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे”.
बाटगा प्रसाद लाड मला हिंदू धर्म शिकवणार आहेत का? हा माणूस पक्षामध्ये धंद्यासाठी काम करतो. माझ्याकडे बोट दाखवून का बोलतो, तो मला राजीनामा देण्यास कसे सांगू शकतो? माझा पक्षप्रमुख निर्णय घेतील. मला कसलाही पश्चाताप नाही, माझ्यातील शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर अन्यही केसेस आहेत. हिंदुत्वासाठी खटले चालवले आहेत.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे पक्षपातीपणा करत असल्याची टीका विरोधकांनी केली होती. मला उपसभापती बोलू देत नाहीत, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी विरोधकांनी “पक्षपातीपणा करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो”, अशा घोषणाही दिल्या. त्यानंतर विरोधकांनी आरडा-ओरडा बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं होतं.