26.2 C
New York

Aditya Thackeray : दीड हजार रुपयांमध्ये कोणाचं भागणार? आदित्य ठाकरे कडाडले

Published:

काल अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र, या विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून सरकारवर सडकून टीका केली. हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा पाऊस असल्याची टीका विरोधकांनी केली. दरम्यान, आता आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) अर्थसंकल्पावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. अर्थसंकल्पाविषयी विचारले असता ते म्हणाले, कालचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर वाटपाचा कार्यक्रम होता. या अर्थसंकल्पात शहरी भागासाठी काय मिळालं? मुंबईस सारख्या मोठ्या शहरातील झोपडट्ट्या आहेत, तशाच आहेत. तिथं वर्षानुवर्षे कामे रखडली आहेत. काही ठिकाणी तर विकासक पळून गेलेत, अशा ठिकाणी या सरकारने एजन्सी बनवून घरं बांधून द्यावीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्प म्हणजे, निवडणुकीच्या आधी फसवणुकीचा कार्यक्रम आहे. कारण, अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी संसदेच्या एफआरएमबी कायद्याचा भंग केला आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

सरकारकडून माझी लाडकी लेक ही योजना जाहीर करण्यात आली. यावर टीका करतांना आदित्य ठाकरे म्हणाले, एवढ्या वर्षात त्यांना शेतकरी आणि बहिणींची आठवण झाली नाही. दिल्लीत शेतकऱ्यांनी मोर्चा काढला तेव्हा त्याच भाजप सरकारने त्यांना अतिरेकी म्हटले. आता महिलांना दीड हजार रुपये महिन्याला देणार आहेत. पण, दीड हजार रुपयांमध्ये कोणाचं काय भागणार आहे?, असा सवाल ठाकरेंनी केला. आमच्या वचननाम्यात महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये देऊ असं वचनं आहे, त्यांची अंमलबजाणी तुम्ही करून दाखवा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

काही मंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना सभागृहात शिव्या दिल्या आहेत. लाडकी बहिण योजना खऱ्या अर्थाने अमलात आणायची असेल तर महिलांना शिव्या देणाऱ्यांनाना बाजूला करा, असंही ते म्हणाले. येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त होर्डिंगसाठी घोषणा केल्या. पण, आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदेंचा पराभव होणार आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img