भारतीय संघाने २००७ (Team India) नंतर शनिवारी दुसऱ्यांदा आयसीसी टिवेन्टी २० विश्वचषकावर (ICC T20 World Cup 2024) भारताचे नाव कोरले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील असंख्य क्रीडाशौकीनानी पाहिले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद मध्यरात्र उलटून गेली असतानाही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याच्या साथीदारांच्या आनंदाला तर उधाणच आले होते. १९८३ साली कपिलदेवच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक करंडक पटकावला तेव्हा भारतात अक्षरशा दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक क्रिकेटशौकीन रस्ते, चौक आणि ठिकठिकाणी एकत्र आले आणि त्यानी फटाक्यांची आतषबाजी केली. २०११ साली महेंद्र सिंग धोनीच्या (Mahendra Singh) नेतृत्वाखाली भारतीय संघाने वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला तेव्हाही देशभरातून विजय साजरा करण्यात आला. २००७ साली धोनी कर्णधार असताना भारतीय संघाने आयसीसीच्या पहिल्या टिवेन्टी २० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तेव्हाही विजयाचा आनंद लुटण्यात आला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने (Virat Kohli) एकमेकाला मिठ्या मारल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहाताना दिसले .
शनिवारी मात्र ब्रिजटाऊनच्या केनींग्स्टनच्या स्टेडियमवर कर्णधाररोहित शर्माआणि त्याचे सहकारी आनंदाच्या डोहात अक्षरशा डुंबत होते. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकमेकाला मिठ्या मारल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहाताना दिसले. अखेरच्या षटकात डेव्हीड मिलरचा महत्वाचा बळी मिळवून भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याला तर आपले आनंदाश्रू आवरेनासे झाले. महम्मद सिराज, अक्षर पटेल वगैरे खेळाडूंचे डोळेही आनंदाश्रूने पाणावलेले दिसले. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मैदानातच भारताचा तिरंगा रोवून भारतीय क्रिकेट संघच श्रेष्ठ हे दाखवून दिले. भारतीय खेळाडूंच्या पत्नीही आनंदाने हरखून गेल्या होत्या रोहित शर्माचे आनंदाश्रू त्याच्या पत्नीने पुसले तर जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी आणि मुलगी एकत्रीत येऊन आनंद घेत होते. भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली मोबाईलद्धारेच आपल्या कन्येशी खूणा करून आनंद व्यक करताना दिसला. एकमेकाला आणि कुटुंबियाना भेटून झाल्यावर मग भारतीय खेळाडूनी पारंपारिक भांगडा नृत्य सादर केले. यामध्ये अर्शदीप सिंग आघाडीवर होता. विराट कोहलीने मग अर्शदीपला योग्य ती साथ देत मी पण भांगडा नृत्य करू शकतो हे दाखवून दिले. देशात एखाद्या मिरवणूकीच्या अग्रस्थानी उ्त्साही कार्यकर्ते ढोल ताशा, डिजे तसेच इतर पारंपारिक संगिताच्या तालावर नाच करताना दिसतात. शनिवारी भारतीयसंघातील खेळाडू आपण आंतरराष्टीय स्टेडियमवर आहोत हे क्षणभर विसरले आणि त्यानी कोणतीही भिड न ठेवता भांगडा करून आनंद साजरा केला. गेल्या सतरा वर्षातील टिवेन्टी २० विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याचे त्यांच्या देहबोलीवरून जाणवत होते. मला वाटते खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियानी अशा प्रकारे आनंद साजरा करून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यानी हम एक है असाच जणू संदेश जगाला दिला.