23.1 C
New York

Hardik Pandya : टीम इंडिया जिंकली अन् हार्दिकच्या डोळ्यांत पाणी; म्हणाला

Published:

टीम इंडियाने अकरा वर्षांचा दुष्काळ संपवत (IND vs SA Final) विश्वचषकावर नाव कोरलं. भारताच्या या विजयात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचाही (Hardik Pandya) मोलाचा वाटा राहिला. सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये अचूक मारा करत त्याने स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला (David Miller) पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडल. त्यानंतरच्या पाच चेंडूतही फक्त 8 धावा देत संघाला विजय मिळवून दिला. विश्वचषक जिंकल्याचा आनंद (T20 World Cup 2024) सगळा देश साजरा करत असताना याच हार्दिकच्या डोळ्यांत मात्र अश्रू तरळले.

आयपीएल स्पर्धेपासूनच हार्दिक ट्रोलर्सच्या निशाण्यावर होता. पांड्याला मुंबई संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. रोहित शर्माकडून (Rohit Sharma) कप्तानी काढून टाकण्यात आली होती. यानंतर हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला या स्पर्धेत विशेष कामगिरी करता आली नव्हती. पण, त्याची कसर हार्दिकने टी 20 विश्वचषकात भरून (T20 WC) काढली. फायनल सामन्यात जिंकल्यानंतर (T20 World Cup Final) हार्दिकने अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.

‘या’ दिवशी परतणार टीम इंडिया मायदेशी

हार्दिक म्हणाला, मागील सहा महिने माझ्यासाठी खूप खराब गेले. हा काळ मी कसा व्यतित केला ते सांगू शकत नाही. मला रडायचं होतं पण रडलो नाही. कारण मला लोकांना काही दाखवायचं नव्हतं. जे लोकं माझ्या अडचणीच्या काळात खूश होत होते मी त्यांना आणखी आनंद देऊ इच्छित नव्हतो. आज मला देवानं संधी सुद्धा अशी दिली की सामन्यातील अखेरची ओव्हर मलाच मिळाली.

Hardik Pandya शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिकची कमाल

दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंह (Arshadeep Singh) आणि जसप्रित बुमराहच्या चार-चार ओव्हर टाकून झाल्या होत्या. त्यामुळे शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देण्यात आली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने डेव्हिड मिलरला तंबूत धाडलं. यानंतरही हार्दिक पांड्याने चिवट गोलंदाजी करत फक्त 8 धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

वेगवान गोलंदाज अर्शदीपनेही सामन्यात चिवट गोलंदाजी केली. त्याने फेकलेल्या चेंडूंवर आफ्रिकेचे फलंदाज अडखळताना दिसत होते. आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम पॉवर प्लेच्या आत बाद झाला. अर्धशतकाकडे वाटचाल करत भारतासाठी धोकादायक ठरू लागलेला डिकॉकही तंबूत परतला. अर्शदीपने त्याच्या चार ओव्हर्सच्या स्पेलमध्ये फक्त 20 रन देत दोन महत्वाच्या विकेट मिळवून दिल्या. क्विंटन डिकॉकची घेतलेली विकेटही टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img