23.1 C
New York

IND vs SA Final : पवारांकडून टीम इंडियाचे अभिनंदन, सूर्यकुमारने घेतलेल्या झेलचे कौतूक

Published:

मुंबई

T20 वर्ल्डकपमध्ये (ICC T20 World Cup) विजय साकारत टीम इंडियाने अकरा वर्षांचा (IND vs SA Final) दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत थरारक पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. अंतिम ओव्हरपर्यंत या सामन्यातील थरार कायम होता. एक वेळ अशी आली होती की भारताच्या हातून (Team India) सामना निसटेल की काय अशी शंका येत होती. परंतु, मैदानातील संघातील खेळाडूंची कामगिरीच निर्णायक ठरली आणि टीम इंडियाच्या शिलेदारांनी विश्वचकावर आपले नाव कोरले. टीम इंडियाने केलेल्या कामगिरीबद्दल देशभरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीम इंडियाचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

शरद पवार म्हणाले की, शनिवारच्या सामन्यात टीम इंडियाने अद्भूत खेळी केली. सुरुवातीला चिंता वाटावी अशी भारताची स्थिती होती. शेवटी शेवटी तर दक्षिण अफ्रिकेला 24 बॉलमध्ये 26 रन्सची आवश्यकता होती तेव्हा काही खेळाडूंनी दमदार खेळी करुन दाखवली. त्यामुळे आपल्याला यश मिळाले. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ केला. सूर्यकुमारने घेतलेला झेल तर अप्रतिम होता. राहुल द्रविडच्या रुपाने भारताला योग्य कोच मिळाला. द्रविडने योग्य मार्गदर्शन केले, टीमचा आत्मविश्वास वाढवला. याचा सामूदायिक परिणाम कालच यशामध्ये झालेला दिसला आहे. सर्वच खेळाडूंनी आपलं 100 टक्के दिलं. टी-20 वर्ल्डकपसाठी सर्व खेळाडूंचं कौतूक आहे.

केन्सिंग्टन ओव्हल येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक-2024च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून भारत जगज्जेता बनला. अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. आपला पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कडवी झुंज दिली, पण 20 षटकांत दक्षिण आफ्रिकेने 8 गडी गमावत केवळ 169 धावा केल्या. भारताने दुसर्‍यांदा अशी कामगिरी नोंदवली आहे. याआधी भारताने 2007मध्ये पाकिस्तानला नमवून पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर आता जवळपास 17 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img