23.1 C
New York

Raj Thackeray : पोर्श कार अपघात प्रकरणावरून राज ठाकरे संतापले, म्हणाले..

Published:

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका बिल्डरच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवून दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिश अवधिया (Anish awdhiya) आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुण-तरुणींचा मृत्यू झाला. या घटनेला जवळपास एक महिना उलटून गेला असला तरीही या प्रकरणाची अद्यापही चर्चा सुरूच आहे. दरम्यान, यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरेंनी नुकतीच अमेरिकेमधील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतंना त्यानंनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुण्यातील अपघात प्रकरणावर संताप व्यक्त करतानाच त्यांनी व्यवस्थेवरही संताप व्यक्त केला. ते म्हणाले, पुण्यात एका मुलाने पोर्श कारने दोन मुलांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर माध्यमात त्या मुलाचे बाबा, आई, आजोबा या सर्वांची चर्चा झाली. मात्र, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांबाबत कोणीही बोलत नाही. कोणत्याही वृत्तवाहिनीवर त्यांची किंवा त्यांच्या आईवडिलांची चर्चा होतांना दिसत नाही, अशी भावना राज ठाकरेंनी बोलून दाखवली.

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले

पुढं बोलतांना ते म्हणाले, जेव्हा ही घटना घडली आणि प्रकरण न्यायालयात गेलं. तेव्हा न्यायाधिश त्या मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगतात, हे कोणते न्यायाधीश? हे सगळ उगाच घडत नाही. पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच अशा घटना घडत असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा, पोलिसांवर, प्रशासनावर, न्यायालयांवर की राजकीय नेत्यांवर? या सगळ्यांवरून जर लोकांचा विश्वास उडाला तर आपण अराजकतेकडे जाऊ, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, अलीकडेच अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याच्या प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सीएम शिंदेंनी त्यांना दिलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img