21 C
New York

IAS Sujata Saunik : सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव

Published:

मुंबई

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक (IAS Sujata Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा बहुमान पटकावणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. राज्याचे मुख्य सचिव (chief state secretary) नितीन करीर यांचा कार्यकाळ आज संपुष्टात येत आहे.

आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता माजी मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. हा बहुमान पटकावणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. यापूर्वी गृहसचिव या पदावर असलेल्या चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी, मेधा गाडगीळ या तिघीही सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या दावेदार होत्या. पण त्यांना संधी मिळू शकली नाही.

कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक या सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचं शालेय आणि महाविद्यालीन शिक्षण चंदीगड त्यानंतर पंजाबमध्ये झालं. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यापूर्वी त्यांनी कौशल्य विकास, गृहमंत्रालय पदावर अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. 

महाराष्ट्रात आर्थिक सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img