21 C
New York

IND vs SA : ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची ‘टी 20’ मधून निवृत्ती

Published:

भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठी मोठी घोषणा केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही आपण आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं आहे. (IND vs SA) भारतानं 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. (Rohit Sharma) यानंतर दोन्ही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, एका बाजूला भारत जिंकला म्हणून आनंदोस्तव तर दुसऱ्या बाजूला दोन महान खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याचं दु:खं असं दुरेही चित्र काल सामन्यानंतर पाहायला मिळालं.

IND vs SA विश्वकर जिंकण हे स्वप्न

फायनलनंतर रोहितनं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचा निर्णय जाहीर केला. ‘हा माझा देखील शेवटचा सामना होता. यापेक्षा अधिक चांगला क्षण या प्रकाराला निरोप देण्याचा नाही. माझी कारकिर्द मी भारतीय टीममधील याच प्रकारातून सुरु केली. विश्वकप जिंकणं हे माझं ध्येय होतं. मला या भावना शब्दात मांडणं अवघड आहे. हा माझ्यासाठी प्रचंड भावुक प्रसंग आहे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजेतेपद पटकावयचं होतं. आम्ही ते मिळवू शकलो, याचा मला आनंद आहे,’ असं रोहितनं सांगितल.

टीम इंडियाने 11 वर्षानंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी

IND vs SA सामनावीर विजेता

यावेळी तो म्हणाला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप हा माझा शेवटचा होता आणि हेच आम्हाला साध्य करायचं होतं. भारतासाठी शेवटचा ट्वेंटी-२० सामना महत्त्वाचा होता. आम्हाला चषक मिळवायचा होता, बळजबरी करण्यापेक्षा परिस्थितीचा आदर करायचा होता. पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे, काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि ध्वज उंच फडकावत ठेवतील अशा भावना विराटने व्यक्त केल्या. तसंच, २०११मध्ये सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलले गेले होते आता विराटला खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे, असं विचारताच तो म्हणाला, ‘रोहितने नऊ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळले आहेत, हा माझा सहावा आहे. तो यासाठी पात्र आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मला आत्मविश्वास नव्हता. परंतु, आत्ता कृतज्ञ आणि नम्र आहे, भावनांना आवर घालणं कठीण आहे असंही विराट यावेळी बोलला.

IND vs SA दुष्काळ संपवला

कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२००७ आणि २०११) नंतर ३७ वर्षीय रोहित शर्मा हा टी-२० विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. भारतीय कर्णधार आता जिंकलेल्या ५० टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विश्वचषक अंतिम सामना हा त्याच्या कारकिर्दीतील ५वा विजय आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात संघाकडून अप्रतिम कामगिरी केल्यानंतर रोहितने टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारलं. टी-२० विश्वचषक जिंकणारा रोहितच्या नेतृत्वाखाली एकही सामना न गमावता भारत पहिला संघ ठरला आहे. आयसीसीची ट्रॉफी जिंकत यामुळे ११ वर्षांनी भारताने दुष्काळ संपवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img