19.7 C
New York

Devendra Fadnavis : फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले

Published:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणसी (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता चांगलाच टोला लगावला आहे. आमदार अमित साटम यांच्या ‘उडान’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

Devendra Fadnavis नाव न घेता टीका

फडणवीस यावेळी म्हणाले, अमित साटम नगरसेवकही नव्हते तेव्हापासून मी तुम्हाला पाहतोय. तुम्ही एक निवडणूक हरला होतात. आणि दुसऱ्या निवडणुकीसाठी तयारी करत होतात. आणि पुढे तुम्ही ती निवडणूक तुम्ही जिंकलात. तुम्ही खरंच तुमचं पॅशन करिअरच्या रुपाने घडवलं आहे असं म्हणत, पॅशन आणि करिअरबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली.

दीड हजार रुपयांमध्ये कोणाचं भागणार? आदित्य ठाकरे कडाडले

Devendra Fadnavis टाळ्यांचा कडकडाट

कोणाला फोटोग्राफी आवडते कधी काय होतं आणि ते मुख्यमंत्री बनले तर समस्या निर्माण होते. मी कोणाचं नाव घेत नाहीयं, हा राजकीय कार्यक्रम नाही. पण मी एक उदाहारण देतोय. ज्या गोष्टीची पॅशन असतं ती आपण केली तर त्याचा फायदा होतो. असं म्हणत त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट आणि हशा पिकला होता.

Devendra Fadnavis अभिमानाची गोष्ट

अमित यांचं राजकारणात आक्रमक व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून श्रीकांत हा त्यांचा आवडता खेळाडू आहे. तेही आक्रमक होते. तसंच, वैयक्तिक आयुष्यात अमित साटम त्यांच्या ते शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यांना त्यांच्या जीवनात आध्यात्मिक प्रेरणा रविशंकरजींमुळे मिळाली आहे. त्यांनी लिहिलेल्या या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते होणं ही अभिमानाची गोष्ट आहे असंही फडणवी यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img