3.1 C
New York

UGC NET : UGC-NET, CSIR-UGC NET परीक्षा कधी होणार?

Published:

एनटीएने (NTA) शुक्रवारी रात्री UGC-NET परीक्षेसाठीची नवी तारीख जाहीर केली आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अनियमितता झाल्यावरून वाद निर्माण झाला असताना रद्द करून ती पुढे ढकलण्यात आली होती. (UGC NET) ती परीक्षा आता UGC-NET परीक्षा (NET) आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. 18 जूनला यूजीसी नेट परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवसी ती परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती.21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. यूजीसी नेट, एनसीईटी आणि सीएसआयआर नेट परीक्षेच्या तारखा एनटीएनं जाहीर केल्या आहेत. डार्कनेटवर पेपर लीक झाल्यानंतर एका आठवड्यानंतर यूजीसी नेट परीक्षा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती.

UGC NET ९ लाख विद्यार्थी

या वेळची फेरपरीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याबरोबरच ऑल इंडीया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षा दि. 6 जुलै रोजी घेतली जाणार आहे. पेपरफुटी झालेली नेट परीक्षा 18 जूनला दोन सत्रांत 317 शहरांमध्ये झाली होती. तेव्हा 9 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. UGC NET परीक्षेतील अनियमिततेमुळे NTA ने ही परीक्षा रद्द केली होती, तर CSIR UGC NET परीक्षा 25 ते 27 जून 2024 या कालावधीत होणार होती, जी अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.

‘हा’ महामार्ग मृत्यूचा ठरतोय सापळा

परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. शिक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, ‘परीक्षा प्रक्रियेची सर्वोच्च पातळी पारदर्शकता आणि पावित्र्य राखण्यासाठी, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन चाचणी घेतली जाईल आणि त्याची माहिती लवकरच दिली जाईल. सीबीआय या प्रकरणाचा व्यापक तपास करणार आहे.

UGC NET एनटीएकडून खबरदारी

परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी १९ जूनला पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते. देशात विविध परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या अनागोंधी कारभाराचं पितळ उघडं पडलं आहे. पेपर फुटीच्या वातावरणामुळं सबंध देश ढवळून निघाला असताना नेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीए ने समाधानकारक पाऊल उचलेलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img