8.4 C
New York

IND vs SA Final : विराट कोहलीने शेवटच्या सामन्यात दाखवला जलवा

Published:

IND vs SA Final : विराट कोहलीचं संयमी अर्धशतक, अक्षर पटेलची झंझावाती खेळीच्या बळावर टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 176 धावांचा पाऊस पाडलाय. शिवम दुबे यानेही निर्णायक 27 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकाकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांना 177 धावांचा बचाव करायचा आहे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

IND vs SA Final विराटचं संयमी अर्धशतक


विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराट कोहलीने आपला अनुभव झोकत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 76 धावांची खेळी करत भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीला लागोपाठ विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. त्यानं एकेरी दुहेरी धावसंख्या काढत डावाला आकार दिला. अक्षर पटेल याच्यासोबत आधी निर्णायक 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात शिवम दुबे याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. अर्धशतक ठोकण्यासाठी विराट कोहलीने 48 चेंडू घेतले, पण त्यानंतर चौकार-,ठकारांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने 59 चेंडूमध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 46 धावा चोपल्या.

IND vs SA Final अक्षर पटेलचा झंझावत, फक्त तीन धावांनी अर्धशतक हुकले


अष्टपैलू अक्षर पटेल यानं निर्णायक फलंदाजी करत टीम इंडियाचा डावाला आकार दिला. 34 धावांवर तीन विकेट… अशा खराब स्थितीमध्ये असताना अक्षर पटेल यांनी झंझावाती फलंदाजी करत डाव सावरला. विराट कोहलीनं एकेरी दुहेरी धाव घेत अक्षर पटेलची चांगली साथ दिली. अक्षर पटेल यानं 31 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी केली. या खेळीला एक चौकार आणि चार षटकारांचा साज होता. अक्षर पटेल यानं विराट कोहलीसोबत 72 धावांची भागिदारी केली. अक्षर पटेलच्या झंझावाती फलंदाजीमुळे टीम इंडियाची धावसंख्या झटपट वाढली. अक्षर पटेल याचं अर्धशतक फक्त तीन धावांनी हुकले, पण त्यानं आपलं काम चोख बजावले. झटपट विकेट पडल्यामुळे अक्षर पटेल याला फलंदाजीत प्रमोशन देण्यात आले होते, याचं त्यानं सोनं केलं.

IND vs SA Final विराट-अक्षरची शानदार भागिदारी


भारताला 34 धावांवर तीन धक्के बसले होते. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव एकापाठोपाठ एक तंबूत परतले होते. भारताची फलंदाजी ढेपाळली होती. पण विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी शानदार फलंदाजी करत डावाला आकार दिला. विराट कोहलीने अनुभव पणाला लावत एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल यानं वादळी फलंदाजी केली. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 72 धावा जोडल्या. अक्षर पटेलने आपल्या वादळी फलंदाजीमध्ये 4 षटकार आणि एक चौकार ठोकला.

IND vs SA Final शिवम दबेचा फिनिशिंग टच


शिवम दुबे यानं अखेरीस वादळी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. त्यानं चौकार-षटकार ठोकत निर्णायक क्षणी धावसंख्या वाढवली. शिवम दुबे याने16 चेंडूमध्ये 27 धावांचा इम्पॅक्ट पाडला. यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. दुबेच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने 175 धावसंख्या पार केला. रवींद्र जाडेजा 2 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्या पाच धावांवर नाबाद राहिला.

IND vs SA Final भारताची खराब सुरुवात


रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि विराट कोहलीने पहिल्या षटकात आपले इरादे स्पष्ट केले. विराट कोहलीने पहिल्याच षटकात मार्को यान्सनला तीन खणखणीत चौकार ठोकत हल्लाबोल केला. पण पुढच्याच षटकात केशव महाराजने टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. केशव महाराजने आधी रोहित शर्माला तंबूत धाडले. त्यानंतर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचीही विकेट घेत टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या. रोहित शर्मा 5 चेंडूत दोन चैकारांच्या मदतीने 9 धावा काढून बाद झाला. ऋषभ पंत याला खातेही उघडता आले नाही. सूर्यकुमार यादवही मोठी खेळी करु शकला नाही. कगिसो रबाडा यानं सूर्याला तीन धावांवर तंबूत परतला.

IND vs SA Final दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी


दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवात भेदक केली. पण अक्षर पटेल आणि विराट कोहली यांनी काऊंटर अॅटक केला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं तीन षटकात 23 धावाच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. कगिसो रबाडा यानं चार षटकात 36 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. मार्को यान्सन यानं 4 षठकात 49 धावा खर्च करत एक विकेट घेतली. एडन मार्करन, तरबेज शम्सी, मार्को यान्सन यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली. एनरिक नॉर्खिया यानं भेदक मारा करत चार षटकात फक्त 26 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img