21 C
New York

Vicky Kaushal: सध्या तरी तुम्ही ‘बॅड न्यूज’ पाहा…माझी ‘गुड न्यूज’ मी लवकरच सांगेन

Published:

Vicky Kaushal: गेल्या काही काळापासून कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) दोघेही लंडनला सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी एकत्र गेले होते. कतरीनाची फॅशन आणि स्टाईल पाहून अनेकांनी ती प्रेग्नंन्ट असल्याचा अंदाज वर्तवला होता. कतरीना प्रेग्नंन्ट असल्याच्या चर्चा अनेकवेळा झाल्या आहेत. आता या चर्चांवर विकी कौशलने स्वतः मौन सोडलं आहे. सध्या विकी कौशल त्याच्या ‘बॅड न्यूज’ (Bad News) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला, आणि या ट्रेलर लाँचिंगच्या इव्हेंटमध्ये त्याने असं सांगितलं की, योग्य वेळ आली मी सर्वात पहिली ‘गुड न्यूज’ तुम्हाला सांगेन.

Vicky Kaushal: पापाराझींने विकीला प्रश्न केला की, “रियल लाईफमध्ये तुझी ‘गुड न्यूज’ कधी येणार आहे?” या प्रश्नावर विकीने ब्लश केलं आणि हसत उत्तर दिलं की, “जेव्हा गुड न्यूज येईल तेव्हा सर्वात पहिलं मी तुम्हालाच सांगेन, सध्या तुम्ही ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट नक्की पाहा. मात्र योग्य वेळ आली की तुम्हाला नक्कीच सांगेन.” ‘बॅड न्यूज’च्या ट्रेलर लाँचिंगच्या इव्हेंटला चित्रपटामधले सर्वच कलाकार उपस्थित होते. इव्हेंटदरम्यान, मीडियाने विकीला त्याच्या खासगी आयुष्याबद्धल प्रश्न विचारल्याने त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले.

Kalki 2898 AD ने मोडले ‘या’ चित्रपटांचे रेकॉर्ड्स; मात्र कमाईत घट

निर्माता करण जोहरच्या (karan Johar) धर्मा प्रोडक्शनने (Dharma Production) ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी (Anand Tiwari) यांनी केलं आहे. ‘बॅड न्यूज’हा चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलमध्ये रोमँटिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी,(Trupti Dimri) नेहा धूपिया, (Neha Dhupia) आणि एमी विर्कही (Emmy Virk) दिसणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img