समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबत नाही. हा महामार्ग मृत्यूचा (Samruddhi Mahamarg) सापळा ठरू लागला आहे इतके अपघात या महामार्गावर होत आहेत. आताही (Jalna Road Accident) एक भीषण अपघाताची बातमी धडकली आहे. जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही कार महामार्गावरील बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे.
काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर कडवंची गावाजवळ हा अपघात झाला. सात जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. समृद्धी महामार्गा पोलीस आणि जालना पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. वाहनांतून मृतदेह बाहेर काढले. तसेच जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आल्या. काही वेळानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मुंबईच्या मालाड पूर्व भागातील मन्सूरी कुटुंबातील 6 जण आपल्या इर्टीका कारमधून (क्र. एमएच 47, बीपी-5478) नागपूरकडून मुंबईकडे रात्री समृद्धी महामार्गाने निघाले होते. या अपघातात फैजल शकिल मंसूरी, फैयाज मंसूरी, अलथमेस मंसूरी (सर्व रा. मालाड पूर्व) आणि डिझायर कारमधील चालक संदीप माणिकराव बुधवंत (वय 30), विलास सुदाम कायंदे (वय 28, दोघेही रा. उमरखेड ता. देऊळगाव राजा) आणि प्रदीप लक्ष्मण मिसाळ (रा. पिंपळगाव बु. ता. देऊळगाव राजा) हे 6 जण जागीच ठार झाले आहेत.
अपघातातील मृत व्यक्तींची नावं
- फय्याज शकील मंसुरी, मालाड मुंबई पूर्व
- फैजल शकील मंसुरी,मालाड मुंबई पूर्व
- अल्थमेश मंसुरी (सर्व रा. मालाड मुंबई पूर्व, आर्टिका कार क्र. MH 47 RP 5478 मधील)
- प्रदिप लक्ष्मण मिसाळ वय 38 वर्ष रा. पिंपळनांव ता. दे. राजा.
- संदीप माणीकराव बुधवंत वय 30 वर्ष (कार चालक)
- विलास सुदान कायंदे वद 28 वर्ष रा. उरकीड ता. दे.राजा (स्वीफट कार का. MH 12 MF 1856 मधील इलम
अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी मोफत विजेसह ‘या’ केल्या घोषणा
अपघाताची माहिती कळताच पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत जखमींना ॲम्बुलन्समधून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं. धर्मन यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या आर्टिका गाडीला क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आला. अपघातातील चारपैकी तिघांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमींपैकी तिघांची ओळख पटलेली आहे. अल्ताफ मन्सूरी, शकील मन्सूरी आणि राजेश अशी तीन जखमींची नाव आहेत.
Road Accident नेमका कसा झाला अपघात?
समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन गाड्यांची जोरदार टक्कर झाली. या अपघातात आर्टिका गाडी जी नागपूरवरून मुंबईला जात होती. या गाडीची राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीवर जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली.