3.8 C
New York

Ravindra Chavan : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

Published:

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या महामार्गाची सर्व कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गादरम्यान पनवेल ते इंदापूर ही लांबी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारित आहे. पनवेल ते कासू या दरम्यानचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून, फक्त सेवारस्ते आणि गडब येथील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. कासू ते इंदापूर या लांबीमधील ७२ टक्के काम पूर्ण झाले असून भुयारी मार्ग उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. तसेच इंदापूर ते झाराप हा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत आहे. या लांबीमधील ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. इंदापूर ते झाराप या लांबीमध्ये एकूण दहा पॅकेजेसच्या कामांसाठी मंजूर असलेल्या एकूण ६,१००.४४ कोटी इतक्या रकमेपैकी आजपर्यंत ३,५८०.३३ कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे. एकूण ३५५.२८ किमी संकल्पित लांबीपैकी २९५.४०२ किमी लांबीचे काम (अंदाजे ८५ टक्के) पूर्ण झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img