21 C
New York

IND vs SA Final : पैसाच पैसा! टी 20 विजेता संघ होणार मालामाल

Published:

टी 20 विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात (T20 World Cup 2024) आहे. आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Final) यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर विश्वविजेता कोण होणार याचं उत्तर मिळणार आहे. या स्पर्धेत विजेत्यालाच नाही तर सामना गमावणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच आयसीसीने (ICC) पारितोषिकाच्या रकमेची घोषणा केली होती. भारतीय करन्सीमध्ये ही रक्कम जवळपास 93.5 कोटी रुपये इतकी आहे. सन 2022 मधील टी 20 वर्ल्डकपमधील बक्षिसाच्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. मागील वर्ल्डकपमधील रक्कम 46.6 कोटी रुपयांबरोबर होती. यामध्ये विजेता इंग्लंड (IND vs ENG) संघाला 13.3 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. चला तर मग जाणून घेऊ या यावेळच्या विजेत्या संघाला किती पैसे मिळतील.

फायनल सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) आमनेसामने असतील. हा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला बक्षीस म्हणून जवळपास 20.4 कोटी रुपये मिळतील. दुसऱ्या उपविजेत्याला 10.6 कोटी रुपये मिळतील. या वर्ल्डकपमध्ये सर्वात तळाशी असणाऱ्या संघानाही पैसे दिले जाणार आहेत. सेमी फायनलमध्ये पराभूत होणारे संघही मालामाल होणार आहेत. या संघाना जवळपास साडेसहा कोटी रुपये मिळणार आहेत.सेमी फायनलमधील चार संघांव्यतिरिक्त सुपर 8 च्या पुढे जाऊ न शकलेले चार संघांसाठीही काही पैशांची तरतूद करण्यात आली आहे. या संघांना प्रत्येकी 3.19 कोटी रुपये मिळतील. तसेच साखळी फेरीतच गारद होणाऱ्या बारा संघानाही बक्षीस देण्याचे नियोजन आयसीसीने केले आहे. ग्रुप स्टेजमध्ये आपापल्या गटात तीन नंबरवर राहणाऱ्या प्रत्येक संघाला अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत.

…जाणून घ्या टीम इंडियाच्या विजयाचे तीन फॅक्टर

तसेच जे संघ गुणांच्या आधारे 13 पासून 20 व्या क्रमांकावर राहिले अशा प्रत्येक संघाला 1.87 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आयसीसीने बक्षिसाच्या रकमेत अशीही तरतूद केली आहे की या स्पर्धेत एक सामना जिंकल्यानंतर संबंधित संघाला 26 लाख रुपये मिळतील. उदाहरणार्थ स्पर्धेत एखादा संघ फक्त एकच सामना जिंकला असेल तर त्या संघाला 26 लाख रुपये वेगळे मिळतील. तर दोन सामने जिंकणाऱ्या संघाला 52 लाख रुपये मिळतील. त्यामुळे विजेत्या संघाबरोबरच पराभूत आणि स्पर्धेतून बाद झालेल्या संघांवरही बक्षिसांची लयलूट होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img