टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup)स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण अफ्रिका (IND vs SA Final) यांच्यात बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. या सामन्याला भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. जवळपास 11 वर्षांपासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात टीम इंडियाला अपयश आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियासाठी शिवम दुबे व विराट कोहली यांचा फॉर्म हा चिंताजनक आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा हे प्लेइंग इलेव्हनमध्ये आता बदल करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.
IND vs SA Final कशी असेल खेळपट्टी?
बार्बाडोसमधील केन्सिग्टन ओव्हल, ब्रिजटाउन स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत आठ सामने खेळले गेले. खेळपट्टी गोलंदाज तसेच फलंदाजासाठी उपयुक्त आहे. या मैदानावर भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. मोठी धावसंख्या येथे उभारता येते, धावांचा पाठलाग पण करणे सोपे नाही, 175 पेक्षा जास्त धावा अंतिम सामन्यात पुरेशा ठरतील. बार्बाडोसमध्ये आतापर्यंत 32 टी-20 सामने झाले. ब्रिजटाउन स्टेडियमवर 19 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला.
भारत-दक्षिण आफ्रिकाच्या अंतिम सामन्यात पाऊस आला तर ?
IND vs SA Final T20 विश्वचषकात कोणत्या संघाचा वरचष्मा आहे?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ 26 वेळा T20 फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेला ज्यामध्ये 14 वेळा पराभूत केले आहे, तर पराभवाचा सामना 11 सामन्यांमध्ये करावा लागला आहे.अशाप्रकारे, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे.
IND vs SA Final टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.
IND vs SA Final दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.