8 C
New York

IND vs SA Final : टीम इंडियाने 11 वर्षानंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी

Published:

आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना भारत आणि साऊथ आफ्रिका (IND vs SA Final) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या 76 धावा आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 176 धावा केल्या होत्या. तर साऊथ अफ्रिकाकडून हेन्रिक क्लासेनने 52 धावांची वादळी खेळी केली.

IND vs SA Final टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर अक्षर पटेल याने 47 रन्स केल्या. शिवम दुबेने 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्माने 9, रवींद्र जडेजाने 2 आणि हार्दिक पंड्याने 5* धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिख नॉर्खिया या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन आणि कगिसो रबाडा या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या रोहित आणि विराटने पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरूवात करून दिली खरी पण नंतर साऊथ अफ्रिकेच्या केशव महाराजने टीम इंडियाला दोन धक्के दिले. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत एकामागोमाग बाद झाले. सूर्या देखील लगेच तंबूत परतल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला. तर विराट कोहलीने एक बाजू राखून धरली. अक्षरने काही खराब बॉलवर दांडपट्टा चालवला. तर विराटने धावसंख्या चालवली. विराट कोहलीने 59 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर अक्षरने 31 बॉलमध्ये 47 धावा कुटल्या. शिवम दुबेने काही आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न अक्षर धावबाद झाल्यानंतर केला. अखेरच्या ओव्हरमध्ये त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने टीम इंडियाला 176 धावांवर पोहोचवलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img