राहत्या घरात गळफास घेऊन ‘कुमार महाराष्ट्र केसरी‘ सूरज निकम (Suraj Nikam Suicide) याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. 28 जून (शुक्रवारी) दुपारी 1 वाजता ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. युवा पैलवानाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेला नाही.सांगली जिल्हयात सूरज निकम हा नामवंत मल्ल होता. त्याने कमी कालावधीत कुस्ती क्षेत्रात अनेक किताब पटकविले आहे. नुकतंच त्याने ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ चा ‘किताब देखील पटकवला होता.कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमच्या आत्महत्येमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पैलवान सूरज निकम हा नामवंत मल्ल आहे. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटाकविले आहेत.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ प्रवासी जागीच ठार
काही दिवसापूर्वी सूरजच्या वडिलांचा निधन झालं होतं त्यामुळे तो व्यथित झाला होता पोलिसांनी निधनानंतर त्याचा मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अशी देखील माहिती समोर आली आहे.कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.