3.2 C
New York

Kalki 2898 Ad: Kalki 2898 AD ने मोडले ‘या’ चित्रपटांचे रेकॉर्ड्स; मात्र कमाईत घट

Published:

Kalki 2898 Ad: २०२४ चा चर्चेत असलेला बिगबजेट चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) गुरुवारी २६ जूनला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस आला. दीपिका पादुकोण, (Deepika Padukone) अमिताभ बच्चन, (Amitabh Bacchan) प्रभास,(Prabhas) आणि कमल हसन (Kamal Hassan) असे तगडे कलाकार असलेल्या या चित्रपटबद्धल प्रेक्षकांना भरपूर उत्सुकता होती. बॉलीवूडशिवाय या चित्रपटात टॉलीवूडमधले अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षक, आणि इतर सेलिब्रिटी यांच्याकडून चित्रपटाला मजबूत प्रतिसाद मिळताना दिसतंय. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग करून बऱ्याच चित्रपटाच्या कमाईचे विक्रम मोडले आहेत. दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईची काय धुमाकूळ घातली आहे चला तर मग जाणून घेऊया याबद्धल…

‘कल्की 2898 एडी’ ची पहिल्या दिवसाची कमाई
Kalki 2898 Ad: मिळालेल्या माहितीनुसार, रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ९५ कोटी रुपयांची तुफान कमाई केली. यामधले तेलुगूमध्ये ६४.५ कोटी रुपयांची आकडेवारी, हिंदी भाषेमध्ये २४ कोटींचा डल्ला, मल्याळम भाषेत २.२ कोटी, तमिळ भाषेत चार कोटी तर कन्नड भाषेत ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने जगभरात तब्बल १९१.५ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगमधेच जबरदस्त कमाई केली होती, त्यामुळेच पहिल्या दिवशी चित्रपटाचं कलेक्शन दमदार झालंय.

थोडं सहन करा! “फार थोडे दिवस राहिलेत”, आशाताई झाल्या भावुक…

‘कल्की 2898 एडी’ दुसऱ्या दिवशीचं कलेक्शन
लेखक व दिग्दर्शक नाग अश्विन (Naag Ashwin) यांचा बहुचर्चित ‘कल्की 2898 एडी’ हा सायन्स फिक्शन असलेला चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला आहे. चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतेय. चित्रपटामधले स्टारकास्ट, अनोखे असलेले सेट्स, अनिमेशन, आणि स्पेशल इफेक्ट्सने प्रेक्षकांना अगदी भुरळ घातली आहे. त्यामुळे ‘कल्की 2898 एडी’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर कमाईचा चांगलाच ताबा घेतला आहे. दुसऱ्या दिवशीच्या कमाईची आकडेवारी अजून समोर आलेली नाही. २ दिवसात फक्त भारतामध्ये या चित्रपटाने १४९.३ कोटी कमावले आहेत.

दुसऱ्या दिवशी ‘या’ चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड्स
‘कल्की 2898 एडी’ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. दुसऱ्या दिवशीची कमाई ५४ कोटी कमावून ‘केजीफ २’ (४६.७९ कोटी),‘जवान’ (४६.२३ कोटी), बाहुबली २’ (४०.५ कोटी), ‘गदर २’ (४३.८ कोटी), आणि फायटर (३९.५ कोटी) या चित्रपटांना मागे टाकल्याचं पाहायला मिळतंय. आता पुढे विकेंड असल्याने ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईची किती धुमाकूळ घालतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img