राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पावर जयंत पाटलांनी जिव्हरी लागणारी टीका केली होती. या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चादरवाले आले असे म्हणत जयंत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (CM Shinde Answer On Jayant Patil Statement Over Maharashtra Governemnt New Scheme In Budget)
Jayant Patil काय म्हणाले होते जयंत पाटील?
अजित पवारांच्या अर्तसंकल्पानंतर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया देताना चंदर लगी फटने खैरात लगी बटने असे म्हणत टीकास्त्र सोडले होते. लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारकडून मोठ मोठ्या योजनांची खैरात वाटली जात आहे. ही खैरात आगामी काळात येणाऱ्या विधानसभेसाठी केल्या जात असल्याचेही पाटील म्हणाले होते. तसेच आचारसंहिता लागल्यानंतर या सर्व योजना थंड बसत्यात जातील. महायुतीला लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) फटका एवढा मोठा आहे की मराठीत एक म्हण आहे ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ सध्या महायुतीची चादर फाटली असून त्यांच्याकडून खैरात वाटली जात आहे. या सरकारला खात्री झाली आहे असे जयंत पाटी म्हणाले होते.
पैसाच पैसा! टी 20 विजेता संघ होणार मालामाल
Jayant Patil सभागृहात काय नेमके काय घडले?
पावसाळी अधिवेशात एका तारांकीत प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत होते. त्यावेळी सभागृहात जयंत पाटलांची एन्ट्री झाली. त्यावेळी शिंदेंनी जयंराव आले जयंत राव आले असे म्हटले. तर पाठीमागून अन्य मंत्री आणि आमदारांची घोषणाबाजी सुरू होती. त्यावेळी अचानक शिंदे जयंत पाटलांना नावाने बोलण्याऐवजी चादरवाले आले असे म्हणत डिवचले. शिंदे म्हणाले की, लोकसभेत चादर फाटल्याचे विधान जयंत पाटील केले. पण चादर कुणाी फाटली? मोदी पुन्हा PM झाले. त्यामुळे फाटली कुणाची असा पलटवार शिंदेंनी जयंत पाटलांवर केला. विरोधीपक्ष नेतेपद मिळाले म्हणून पराभूत झालेले पेढे वाटत असल्याचा टोलाही शिंदेंनी यावेळी लगावला.